नवीन लेखन...

विजयादशमी (दसरा)

दसऱ्याला सांस्कृतिक पैलूही आहे. भारत हा कृषिप्रधान देश आहे. जेव्हा शेतकरी आपल्या शेतात सोनेरी पीक उगवल्यानंतर अन्नधान्याची संपत्ती घरी आणतो तेव्हा त्याचा आनंद आणि आनंद टिकत नाही. या आनंदाच्या प्रसंगी, तो देवाच्या कृपेचा स्वीकार करतो आणि तो प्रकट करण्यासाठी त्याची पूजा करतो. […]

वेठबिगार

महानगरांच्या नशीबी नसतो भावनांचा ओलावा निरर्थक धडपड, निर्जीव यांत्रिकता नि पोकळ गिलावा आजूबाजूला सरपटणाऱ्या हातपायांना येथे नसतो चेहेरा सारेच शोधतात निवाऱ्याला एक अपुरा कोपरा भरकटणाऱ्या पतंगागत नसते आयुष्याला दिशा परिस्थितीच्या काजळीने धुरकटणाऱ्या हाताच्या रेषा इथे आयुष्ये नाही जगत रेटली जातात आपोआप लोकलच्या रेटणाऱ्या गर्दीने फलाटावर फेकल्यागत असाच (आणखी) एकदा सूर्य मावळतो, थकला – भागला नि निघतो […]

सप्तरंग

वाहतो पवन बेभान धुंदला उधळीत गंध शब्दभावनांचे गडगडता अंबरी कृष्णमेघनां प्रीतगान, मृदगंघले वसुंधरेचे ओढ अधीर, अवीट मधुरम संथ झुळझुळणे ते निर्झराचे मन ओले, ओले चिंब चिंबले साक्षात्कार प्रसन्न वर्षाऋतुचे स्वर, पावरीचे श्रावण श्रावण सप्तरंगलेले, इंद्रधनु अंतरीचे हे स्वानंदाचे सात्विक सोहळे संगीत जणु, कृतार्थ जीवनाचे — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र. २२६ ५/९/२०२२

भावस्पर्ष कृपाळू

मी अलवार कवटाळीतो अंतरीच्या गतआठवांना हॄदयस्थ, ते ध्यास भास स्मृतींनाच, उलगडताना…. भावस्पर्ष ! मृदुल कृपाळू जगविती माझ्या स्पंदनांना अबोल ओंजळ भावनांची मी, रिती कुठे करू कळेना…. दिव्यत्व,भक्तीभावप्रीतीचे वेदनांची, क्षालनी सांत्वना ओघळ लोचनी जाणिवांचे स्मृतींचा, गंधाळ हुंगतांना…. माथी आभाळ सावळबाधी सांजवेळी हुरहुर पाऊलांना ओढ, हरिपावरीच्या सुरांची मी नित्य आळवितो दयाघना…. — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र. २३२ […]

तुकोबांचे प्रपंच विज्ञान

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये नीता पांढरीपांडे यांनी लिहिलेला हा लेख तुकोबांच्या संपूर्ण प्रपंच विज्ञानाची बैठक त्यांच्या अतिशय खडतर अशा परिस्थितीतूनच निर्माण झालेली आहे. त्यांचा संसार हा इतर सर्वसामान्य जनांसारखा निश्चितच नव्हता. आपल्या संसाराबद्दल आणि त्यातील आपल्या भूमिकेबद्दल तुकारामांनी अनेक अभंगांतून आपले मत स्पष्टपणे मांडलेले आपल्याला दिसते. तुकारामांनी आपल्या आयुष्यातील खडतर अनुभव आणि अवती – […]

डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग ७

त्यासुमारास डॅनलेवस्की या शास्त्रज्ञाने पक्षांमधील मलेरियाच्या परोपजीवांचा अभ्यास केला होता. त्याच्या संशोधनाप्रमाणे काही जातीची कबुतरे मलेरिया पसरविण्यास कारणीभूत आहेत असा निष्कर्ष होता. परंतु अनेक पक्षीशास्त्रज्ञांनी असे सिद्ध केले होते की डास हे पक्षांना चावतच नाहीत तेव्हा रॉसने हे अनुमान पडताळून पहाण्याचा चंगच बांधला. त्याने कबुतरे, चिमण्या, कावळे यांच्या जीवनक्रमाचा अभ्यास सुरू केला. त्याला लक्षात आले की […]

जिम कॉर्बेट – भाग ४

युद्धाच्या काळात जिम बराच काळ बाहेर होता. त्याची बहीण मॅगी कालाढूंगीला एकटीच रहात होती. तेव्हा दळणवळणाची साधने पण नव्हती. जवळचे मोठे शहरसुद्धा २० किलोमीटर दूर! पण मॅगीच्या सुरक्षिततेची चिंता जिमला क्षणभरसुद्धा वाटली नाही. कारण ती त्याच्या मित्रांच्या सहवासात पूर्ण सुरक्षित आहे याची त्याला खात्री होती आणि हे मित्र म्हणजे भारतीय लोकच होते. त्यांच्यावर त्याचा पूर्ण विश्वास […]

तूच सुगंधा

तुझे नित्य येणे जाणे हळूच वळूनी पाहणे नाही कधी विसरलो तुझे ते लाघवी लाजणे आठव ते सारे सुखद निःशब्दी, प्रीतचांदणे तुझे कटाक्ष सांत्वनी निर्मली तुझे गंधाळणे निष्पाप त्या जाणिवा मनास भुलवुनी जाणे तूंच हसरी कमलिका सालस ते तुझे वागणे अजूनही मी स्मरतो रुप तुझे गोजीरवाणे तू स्मरणगंधी सुगंधा तुझे उमलुनी बहरणे — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना […]

ठाण्यातील बालरंगभूमी

व्यक्तिमत्त्व विकासासाठी बालनाट्याचा साधन म्हणून उपयोग करून मनोरंजनाबरोबरच संस्कार करण्याचे कार्य ठाणे शहरातील मंडळी करीत आहेत, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे व भविष्यातही बालरंगभूमीला उज्ज्वल भविष्य आहे, असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही ही खात्री आहे! […]

ताजुद्दीन बाबा ।। श्री गुरुदेव दत्त ।।

गुरुस्वरुपात पूजला जाणारा श्रेष्ठ देव म्हणजे श्री दत्तात्रेय होय. म्हणूनच “श्री गुरुदेव दत्त” असा दत्तात्रेयांचा जयघाष केला जाते. श्री दत्तात्रेय हे गुरुतत्त्वाचे आदर्श स्वरुप आणि योग साधनेचे उपास्यदैवत आहे. शैव, वैष्णव आणि शाक्त या निन्ही संप्रदायायत दत्तात्रेयांची उपासना श्रध्देने केली जाते. दत्तात्रेयांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांची तत्त्वे एकवटलेली आहेत. यामागील रहस्य जाणून घेण्याकरता दत्तात्रेयांची […]

1 13 14 15 16 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..