युरोप ऑन रेल (युरेल) आणि युरो स्टार – भाग १
जीवनात काही गोष्टी योगायोगाने अशा काही घडत जातात, की मागे वळून पाहताना त्या खरंच घडल्या होत्या यावर विश्वास बसत नाही. तशीच गोष्ट माझ्या आयुष्यात घडली आणि ती म्हणजे रेल्वेने युरोपची भ्रमंती! सन १९८० मध्ये माझा एक मित्र वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी जर्मनीत गेला. त्यानं जर्मनीला येण्याचं आग्रहाचं आमंत्रण दिलं आणि त्यातूनच एका अविस्मरणीय रेल्वेप्रवासाची आखणी कागदावर उतरली. […]