माझे आजोळ – भाग ४ -“तेंडोलकर युनिव्हर्सिटी” (आठवणींची मिसळ ३२)
माझ्या आईच्या पिढीतले पणजोबांच्या घराला “तेंडोलकर युनिव्हर्सिटी” म्हणत. कोल्हापुरला राजाराम कॉलेज होते. पुण्यानंतर कुठे कॉलेज नव्हते, त्यामुळे कोंकण, सातारा, इथले सर्व विद्यार्थी तिथेच येत. महाविद्यालयीन अभ्यासाबरोबरच कसं रहावं, कसं वागावं, ह्याचे धडे त्यांना तेंडोलकरांच्या घरी मिळत. त्यामुळे ते आपलं शिक्षण तेंडोलकर युनिव्हर्सिटीत झालं आहे असं अभिमानाने सांगत. पहिली गोष्ट तिथे शिकवली जाई ती म्हणजे काम करणे महत्त्वाचे. तिथे राहिलेल्याला पुढे आयुष्यात कधीही कोणतेही काम करायला लाज वाटायची नाही. आजोबा स्वतः श्रमप्रतिष्ठा आचरणारे होते. दुसरी गोष्ट म्हणजे वायफळ खर्च न करणे. छानछोकीवर पैसे वाया न घालवणे. तिसरी गोष्ट निर्व्यसनीपणा. कोणतेही व्यसन लावून घ्यायचे नाही. […]