पाझर
वाटते सारे विसरुनी जावे परी आठव व्याकुळ करते… श्वासात रुतलीस तूं अशी तुज उसविणे जीवघेणे असते… रुधिरातील तुझीच सळसळ लोचनातुनी अविरत पाझरते… सांग कसे, तुज भुलुनी जावू स्मरण तुझेच जगवित असते… विस्मरणे कां असे इतुके सोपे अंती सरणीही ते सोबत असते वि.ग.सातपुते.( भावकवी ) (976654908 ) रचना क्र. २६९ २३/१०/ २०२२