जीवनखेळी
भरोसा नसला जरी श्वासांचा जीवनखेळी सहजी खेळावी… मनात असावा स्पर्श प्रीतीचा भावशब्दातुनी नाती जपावी… वाळवंटातही अंकुर फुटतो भावनांना फुटावी शब्दपालवी… गीतातुनी उमलावे हृद्य मनीचे फुलांफुलांतुनी प्रीती फुलावी… आलो मोकळे, जाणार मोकळे जीवास वृथा आसक्ती नसावी… सुखनैव जगावे अन जगवावे अंतसमयी मनास खंत नसावी… –वि.ग.सातपुते.(भावकवी ) 9766544908 रचना क्र. २६५ १९/१०/२२