रेल्वे-कामगार संघटना आणि रेल्वेचे संप
रेल्वे-कामगार संघटना पहिल्या महायुद्धाच्या आधीच्या काळामध्ये म्हणजे १९०० ते १९१४ पर्यंत अस्तित्वातच नव्हत्या. तत्पूर्वी, काही प्रांतांतील रेल्वे-कामगार व वरिष्ठ अधिकारी यांच्यात भांडणं, मारामाऱ्या होत. काहींचे तर मृत्यूही झाले होते, पण कामगारांचे हक्क मागणारी, त्यासाठी भांडणारी कोणतीही संघटना स्थापन झालेली नव्हती. त्या काळानुसार रेल्वे कामगारांचा पगार अतिशय कमी होता. संघर्ष होतच होता. त्यांतून मार्ग काढण्याकरता, कामगारांचं संघटित […]