नवीन लेखन...

कला

कला या “जनरिक” शब्दात व्यक्तीच्या हातून जन्माला येणाऱ्या – चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रण अशा मानवी स्पर्शनिर्मित गृहीत असतात तर चित्रपट, नाटक, बॅले या “स्पेशलाइज्ड” आणि सामूहिक कला मानल्या जातात आणि त्यांत मानवेतर घटकांचे (वाद्य, रंगभूषा, प्रकाशयोजना इ) मोठे योगदान असावे लागते. […]

हिमयुगातलं तापमान

गेलं हिमयुग हे सुमारे एक लाख वर्षांपूर्वी सुरू झालं आणि बारा हजार वर्षांपूर्वी संपुष्टात आलं. या हिमयुगाची कमाल शीतावस्था वीस-एकवीस हजार वर्षांपूर्वी होऊन गेल्याचं, विविध पुराव्यांद्वारे दिसून आलं आहे. या कमाल शीतावस्थेच्या काळात पृथ्वीच्या पृष्ठभागावरचं सरासरी तापमान हे, आजच्या सुमारे पंधरा अंश सेल्सिअस या सरासरी तापमानापेक्षा सुमारे सात अंश सेल्सिअसनं कमी होतं. पृथ्वीवरचं त्याकाळातलं पृष्ठभागावरचं तापमान […]

पालखीचा बदलता प्रवास

राज स्त्रिया पालखीचा वापर करीत. वनविहार करायला जाणाऱ्या स्त्रिया पालखीतून जात असतं. उत्सव प्रसंगी, स्वागत प्रसंगी, देवळात जाताना, बाजारात जातांना पूर्वी श्रीमंत स्त्रिया पालखीतून जात असत. स्त्रियांच्या किंवा राजाच्या पालख्या एकट्याच निघत नसत. त्यांच्याबरोबर फार मोठा लवाजमा असे. […]

संकर आणि संकरित प्रजाती

पृथ्वीवरील सजीव आणि वनस्पती यांच्यात, सध्याच्या वेगानं संकर होत राहिला तर कदाचित, हजारो वर्षानंतर, अेकच संमिश्र किंवा संकरीत प्रजाती अस्तित्त्वात राहतील. मानवाच्या बाबतीत, सर्व मानववंशात संकर होअून, कदाचित अेकमेव वंश निर्माण होण्याची शक्यता आहे. कसा असेल तो मानव? त्या संमिश्र प्रजाती? पण तोच खरा `पृथ्वीमानव` असेल आणि पृथ्वीवरील त्याच पृथ्वीप्रजाती असतील. […]

मधुमेह आणि रोगप्रतिकारक शक्ती

सध्या व्याधिक्षमत्व हा परवलीचा शब्द आहे . कोविड १९ च्या काळात तर याला असाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे . दिवाळीच्या आनंदाच्या काळात मधुमेहावर बोलणे जरा अवघडच ! पण तरीही ‘ आरोग्यं धनसंपदा ‘ हा मंत्र जपत आपणाला काही काळजी तर घ्यावीच लागणार . व्याधिक्षमत्व म्हणजे शरीराची व्याधीपासून संरक्षण करण्याची शरीराची क्षमता . यालाच Immunity किंवा प्रतिकारशक्ती […]

पुलंचे मानसपुत्र

पुलंच्या नंतर काही वर्षांतच त्यांचे सगळे मानसपुत्रही इहलोक सोडून परलोकवासी झाले. परवाच पुलंच्या एकशे तिनव्या जयंतीनिमित्त त्यांचे सगळ्यांचे नातू शिल्लक मुलं पणतू सगळ्यांनी एकत्र गेट टुगेदर केलं होतं. साक्षात सरस्वतीने आणि रंगशारदेने त्यांच्या सगळ्यांवर अमृत वर्षाव केला. आमच्या पूर्वजांना आम्ही खुशाल असल्याचा निरोप देण्याची विनंती त्यांनी सर्वांनी पुलंकडे केली. एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात अश्रू घेऊन सर्वजण आपल्या घरी उच्चतम स्मृती घेऊन गेली. […]

लळा जिव्हाळा

लळा जिव्हाळा आता तोंडदेखला बेगडीच प्रेमास्था हीच खंत मनाला…. दुभंगलेली नाती हा शाप जीवाला निष्प्राण संवेदनां प्रीतभाव आटलेला…. प्रश्न कोण कुणाचे मनामनास पडला…. जीणेच केविलवाणे काय सांगावे कुणाला…. मन:शांतीवीना दूजे ? कां? स्वास्थ्य जीवाला अंतर्मुख होवूनी जगावे आळवित दयाघनाला…. — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908  रचना क्र. २८६ ५/११/२०२२

‘अचानक’ – रंजीशही सही !

अचानक हा एकमेव चित्रपट की जेथे कवी /शायर /गीतकार गुलजारला काही वाव नव्हता. संपूर्ण चित्रपटात कोठेही काव्य /कविता नाही म्हणून गुलजारने चित्रपटच कवितेत रुपांतरीत केला – एक अशी कविता जिच्या वर्णनासाठी आपण कायम मेहेंदी हसन साहेबांची गज़ल गुणगुणू – […]

अस्तित्व

महाभारतातील एक गोष्ट आहे. एक गरीब वृद्ध हस्तिनापूरला गेला आणि धर्मराजाला भेटून त्याने दानाची याचना केली. मात्र सूर्यास्त झाल्यामुळे नियमानुसार धर्मराजाने त्याला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले.‌ तो बिचारा माघारी फिरला. हे भीम पहात होता. तो धर्मराजाला म्हणाला, ‘दादा, एक विचारू का? तुम्ही त्या याचकाला उद्या दान देण्याचं कबूल केले आहे, मात्र त्याच्या उद्याच्या आयुष्याची तुम्ही खात्री […]

विश्व कीटक भक्षक वनस्पतींचे

विश्व कीटक भक्षी वनस्पतींचे हे शीर्षक वाचून बऱ्याच वाचकांचे डोळे विस्फारतील. त्यांचा विश्वासही बसणार नाही. परंतु वनस्पती जगतात अशाही वनस्पती आहेत. त्यांची ओळख आपण ह्या लेखात करून घेणार आहोत. महाराष्ट्रातही अशा वनस्पती सापडतात. […]

1 8 9 10 11 12 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..