तिन्हीसांजा
सांजवेळ ही मनोहर स्मरणगंधलेले अंबर सुरम्य क्षितिज केशरी अस्ताचे लाघवी झुंबर उजळता तिन्हीसांजा वृंदावनी ज्योत सुंदर क्षण शांत सुखविती संस्कारी दर्शन सुंदर अगम्य प्रकाश मंदमंद मांगल्याचे भाव सुंदर गाभारी प्रभा निर्मली सात्विक साक्षात्कार पुण्यप्रदी तिन्हीसांजा समाधिस्त आत्मसुंदर लोचनी उद्याची प्रभात भूपाळी हरि श्यामसुंदर — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र.२८३ ३/११/२०२२