November 2022
उपचारांची दिशा बरे वाटावे की बरे व्हावे ?
अग्निशेषं ऋणशेषं व्याधिशेषं विशेषतः । वर्धमाने तु वर्धन्ते तस्मात् शेषं न कारयेत् ।। अर्थात पूर्णपणे न विझलेला अग्नि ( आगीची ठिणगी ) , पूर्णपणे न फिटलेले कर्ज आणि विशेषतः उपचार घेऊन पूर्ण बरी न झालेली व्याधी , हे नेहमीच वाढत राहतात ! अर्थात त्यांचा निःशेष अंत झाल्या खेरीज शहाण्या माणसाने स्वस्थ बसू नये. एखादा दहशतवादी हल्ला […]
प्राची, पश्चिमा
सुंदर प्राची, सुंदर पश्चिमा लालकेशरी उधळण सुंदर… चराचराचे हे रूप अनोखे संवेदनांची ती झालर सुंदर… जीवन केवळ प्रवास इथला प्रारब्धाची अटळ रेखा सुंदर… सारीपाटाचेच फासे जीवनी सारे, भगवंताच्या हाती दोर… सुखदुःखांची साऊली भाळी तिला झेलित, जगावे निरंतर… आज मला हेच कळून चुकले सत्यवास्तव जीवनाचे चिरंतर… — वि.ग.सातपुते.(भावकवी) (9766544908) रचना क्र.२७६ २९/१०/२०२२
भारतीय रेल्वेचे गाढे अभ्यासक – एस. वेंकटरामन
एस. वेंकटरामन हे नव्वद वर्षांचे गृहस्थ खरे रेल्वेप्रेमी. १९२५ साली वयाच्या आठव्या वर्षी मद्रात ते विजयवाडा असा पहिला रेल्वेप्रवास त्यांनी केला. तेव्हापासून त्यांचं आयुष्य रेल्वेशी जोडलं गेलं आहे. रेल्वेत मटिरियल मॅनेजर म्हणून हुबळी, वाराणसी, अशा विविध गावांत त्यांनी काम केलं. रेल्वेमधून निवृत्त झाल्यावर ‘Indian Railways at a glance’ हे त्यांचं पहिलं पुस्तक प्रसिद्ध झालं. गेली ३० […]
मलेरियाची अफ्रिकेतील समस्या
मलेरिया व बर्किट लिम्फोमा – ( एक प्रकारचा कॅन्सर ) यांचा संबंध बर्किट लिम्फोमा हा एक प्रकारचा जबड्याच्या खालच्या बाजूचा कॅन्सर असून तो अफ्रिकेत व मुख्यतः लहान मुलांमध्ये ९ ते १२ वर्षे या वयोगटात आढळतो . आता जगातील दुसऱ्या काही भागातूनही अशा केसेस नोंदल्या गेल्या आहेत . प्रसिद्ध सर्जन डॉ . बर्किट व त्यांचे दोन सहकारी […]
विजयआनंद उर्फ गोल्डी यांचा ज्वेलथीफ
विजयआनंद उर्फ गोल्डी यांचा ज्वेलथीफ हा सर्वकालीन सर्वोत्तम रहस्यपट २७ ऑक्टोबर १९६७ रोजी प्रदर्शित झाला. देव आनंद यांच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम रहस्यरंजक चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाची जादू आजही कायम आहे. […]
गंध कस्तूरी
सखये अजुनही दरवळवतो तुझ्या, प्रीतीचा गंध कस्तूरी…. रुतलेल्या तुझ्या पाऊलखुणा मृदगंधलेल्या या सुन्न वाटेवरी…. आजही तुझेच वेड लोचनांना उमलुनी येती प्रीतभाव अंतरी…. सांगनां, यातुनी सावरावे कसे मृदगंधलेल्या या सुन्न वाटेवरी…. हे गुज, मनीचे मधुरम प्रीतीचे व्याकुळलेले, केशरी सांजतीरी… कालचक्र हे अखंडित अविरत तशीच ओढ़, तुझीच गं निरंतरी…. –वि.ग.सातपुते (भावकवी) (9766544908 ) रचना क्र.२७५ २९/१०/२०२२
जीवनाचे धडे आणि स्वतःशी करार
इतरांचे आपल्याबद्दलचे मत,निरीक्षण सरळ दुर्लक्ष करावे या वैचारिक समृद्धीपर्यंत मी काही वर्षांपूर्वी पोहोचलो. माझ्यावरील संस्कार, माझे पालक, गुरुजन आणि माझा जीवनप्रवास यांच्याबद्दल कृतज्ञता हा सध्या स्थायीभाव केलाय! बाकीचे शांतपणे कुंपणापलीकडे ठेवतो मी. […]
खांदा
एक नामांकित अभिनेत्री; पण काही वर्षांपूर्वीची. एकेकाळी आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी. खरं तर अभिनयाची संधी तिला फार उशिरा मिळाल्यामुळे त्या वयानुसार भूमिका वाट्याला यायच्या, पण त्या सगळ्या तिने अजरामर केल्या. आता मात्र सगळंच चित्र बदललं होतं. एव्हाना लोकांना तिचा विसरच पडला होता. नव्याच्या झगमगाटापुढे जुनं झाकोळलं गेलं. मानमरातब, प्रसिद्धी, पैसा सगळं गेलं अन् शिवाय भरीला वार्धक्य आलं. दोन खोल्यांच्या छोट्याश्या घरात एकटीच राहायची. घरकाम, स्वयंपाकाला एक बाई यायच्या तेवढंच काय ते. बाकी दिवस ढकलणं सुरू होतं फक्त. […]
स्वप्नात माझ्या येशील का?
आज रात्री पुन्हा एकदा स्वप्नात माझ्या येशील का? पुन्हा एकदा तशीच मला आर्त साद घालशील का? जीवनाचा एक डाव माझ्या संगे मांडशील ना! अमोलिक आसवांना माझ्यासंगे देशील का? तुझ्या माझ्या बंधनांना भावनांत गुंफशील का? सांग माझ्या वेदनांना तू दिशा देशील का? काळजाची स्पंदने माझ्या तू होशील का? चांदण्यात वेचलेली फुले तू नेशील का? माझ्यासाठी आसवांना वाट […]