नवीन लेखन...

व्हिडिओ कोच

मुंबई सी एस एम टी ला लोकल प्लॅटफॉर्म वर आली होती पण अनाउन्समेंट किंवा इंडिकेटर वर कोणती लोकल आहे त्याची कुठलीच सुचना नव्हती. त्यामुळे फारशी लोकं लोकल थांबायच्या आत आणि थांबल्यावर सुद्धा चढली नाही. मला कल्याणला जायचे असल्याने मी पटकन चढलो आणि विंडो सीट मिळवली. दोन मिनिटात इंडिकेटर वर ती लोकल 6.53 ची कर्जत फास्ट असल्याचे […]

पुस्तकाचं घर

१९९२  म्हणजे नव्वदीच्या दशकात ज्या गावात शिक्षणाला फारसं महत्व दीलं जात नव्हतं त्या काळात रीटायर्ड मेजर श्री. महादेव गोविंद तोडकर ( MG आण्णा ) यांनी ग्रंथालयाची स्थापना केली आणी गावाला ज्ञानाच्या व्दारात उभा करण्याचं काम केलं. ज्ञानाचं दान तरूणांच्या पदरात देवून त्यांना सुशिक्षीत, सुसंस्कृत बनवण्याचं पहीलं पाउल नव्वदीच्या दशकात त्यांनी टाकलं. […]

सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना?

बघ ना सखे, कसं आभाळ गच्च दाटलंय मनात तुझ्या आठवणींचं काहूर माजलंय… चिंब भिजून या पावसात, कवेत मला घेशील ना? सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना? अंगी झोंबे हा गार गार वारा मोहरून तुझ्या आठवणीने, येई देही गोड शहारा उबदार घट्ट मिठीत घेऊन, मला बिलगशील ना? सांग ना प्रिये सखे, माझी होशील ना? सखे सुरू […]

व्याधिक्षमत्व आणि कॅन्सर

सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्याधिक्षमत्व (Immunity) हा विषय सर्वांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा झालेला आहे . व्याधिक्षमत्वाचा संबंध फक्त कोरोनासारख्या इन्फेक्शनशीच नसून , कुठल्याही रोगापासून शरीराला सुरक्षित ठेवायचे असेल तर उत्तम व्याधिक्षमत्व ही त्याची कवचकुंडले आहेत , मग त्याला कॅन्सरसारखा दुर्धर आजारसुद्धा अपवाद नाही आयुर्वेदाने व्याधिक्षमत्व हे प्रामुख्याने तीन प्रकारचे सांगितलेले आहे . १. सहज , २. कालज , […]

कसे जगावे

आता न कुणीच उरले असे जीवाचे ज्याच्या आठवणीत अजुनी जगावे गाभाऱ्यातील प्रकाशज्योत निमाली अंधारल्या, आठवातुनी कसे जगावे एकांती छळतो भावप्रीतीचा गारवा गोठविणाऱ्या वेदनेतुनी कसे जगावे दाटला सभोवार निर्विकार काळोख आता उगा, कुणाला शोधित जगावे आता न कुणीच उरले असे जीवाचे ज्याच्या आठवणीत अजुनी जगावे — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908  रचना क्र.२९१ ८/११/२०२२

घुस्मटलेले श्वास झाले रे मोकळे- “गोदावरी” !

“खळ खळ गोदा ” अशा खळखळत्या आवाजात जेव्हा राहुल देशपांडे चित्रपटाच्या शेवटी एक प्रकारे “गोदे ” ची आरती करतो, तेव्हा कुचंबलेल्या मीही थोडा स्वच्छ श्वास घेतला. […]

मोनोरेल

भारतातील पहिली मोनोरेल १९०२ ते १९०८ या काळात कुंडला व्हॅली, मुन्नार, केरळ येथे धावत होती. ही रेल खाजगी मालकीची होती. पुढे त्या मार्गाचं नॅरोगेजमध्ये रूपांतर झालं. १९२४ सालापर्यंत तो मार्ग चालू होता. पुढे पुरात वाहून गेल्यावर तो मार्ग बंद पडला. पतियाळा राज्यात फेब्रुवारी १९०७ मध्ये मोनोरेल चालू झाली व ती १९२७ मध्ये बंद पडली. पुढे बऱ्याच […]

परशुराम क्षेत्रातले कोकण

वनराईच्या बोलण्याने आनंदलेल्या आभाळाने एक सुंदर इंद्रधनू जमिनीवर खोवलं. त्यामुळे अवघी कोकणभूमी दृष्ट लागण्याइतकी लोभस दिसू लागली! त्यावेळी समुद्राच्या लाटांची गाज कोकणभूमीला सांगू लागली. ‘हे अपरान्त कोकणभूमे, भारताची पश्चिम भूमी तुझ्यापाशी परिपूर्ण होते, म्हणून तू अपरान्ता. तुझी निर्मिती या आकाशाइतक्याच विशाल मनाच्या दैवी पुरुषामुळे झाली. त्यांचे नाव परशुराम. […]

मर्म जीवनाचे

सत्यशाश्वत आणि अशाश्वत अनुभवल्याविना कळत नाही सत्यप्रेम म्हणजे काय असतं ? केल्याविना कधी कळत नाही… विरह देखील काय असतो ? भोगल्या शिवाय कळत नाही सुख, दुःख, वेदना देखील जगल्या शिवाय कळत नाही… फक्त मीच, हा व्यर्थ अहंभाव कधीच, कुणाचा टिकत नाही परदुःख नेहमी शीतल असते स्वदुःखाचा दाह साहवत नाही… जीवन पुर्वकर्माचा हिशेब सारा चुकविण्या शिवाय पर्याय […]

1 6 7 8 9 10 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..