कर्मफल
अस्वस्थ जीवा छळते घुसमट मन मुक्त मोकळे करत रहावे प्रहर व्याकुळलेला एकांताचा अंतर्मुख होवुनी सत्य जाणावे गतजन्माचे ऋणानुबंध जीवनी जीवाजीवाला जपत रहावे भावशब्दांचे लाघव प्रीतस्पर्शी मुक्तहस्त्ये सदा उधळीत रहावे अगम्य सारिपाट तो जीवनाचा निःसंकोची खेळतची रहावे आपुल्या हाती काहीच नसते भाग्य भाळीचे झेलित रहावे सुखदुःख आनंद खंत वेदना कर्मफल म्हणुनी भोगत रहावे ********* –वि.ग.सातपुते.(भावकवी) (9766544908) […]