कोमसाप एक ध्यास एक प्रवास
एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्याशिवाय ती लवकर पूर्ण होत नाही. भाईंनी कोकणातील कवी, लेखक व रसिकांना जोडण्याचा ध्यास घेतला होता. केवळ तीन महिन्यात सगळी जुळवाजुळव करून 1991 च्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कोकण मराठी साहित्य परिषदेची गुढी उभारली गेली. उत्तर कोकणातून डहाणू, पालघर, केळवे, माहीम, वसई, ठाणे, कल्याण तर दक्षिणेकडील सिंधुदुर्ग जिल्हा यातील साहित्य रसिक कोमसापच्या कल्पनेने भारून गेले. […]