नवीन लेखन...

एक तीळ नऊ जणात…

आमच्या वेळी, म्हणजेच पन्नास वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांविषयी तळमळ असणारे शिक्षक होते. त्याच्याही आधी पु. लं. चे चितळे मास्तर होते. ज्यांनी ‘विद्यादान’ हेच आपलं ध्येय आयुष्यभरासाठी जपलं. मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारात कसंबसं भागवत आपल्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं सोनं केलं. […]

शिवाला पडलेले स्वप्न…

…. ……… गावाकडची गोष्ट………..। .. सकाळ झाली होती झाडावरील पक्षानी आपापली घरटी सोडली होती पक्षी पूर्व दिशेला आकाश मार्गाने भरारी घेऊन पोट कसे भरेल या तयारी त होते. प्रत्येक मानवाला स्वतःचे पोट कसे भरेल याची चिंता लागलेली असते त्याच प्रमाणे मुक्या पक्षाची सुद्धा अशीच गत असते. पोटासाठी मुखे पक्षी भ्रमंती करतात त्याचप्रमाणे मानव सुद्धा वीतभर पोटासाठी […]

आत्मनिर्भरता

परदेशात मुलांनी सेटल होणं, कायमचं अंतरणं या गोष्टी महाराष्ट्रातील आई-वडिलांना नवीन नाहीत. चावून चोथा झालेले हे विषय आहेत आणि तरीही पुन्हा पुन्हा कोणाच्या तरी बाबतीत किंवा कधी कधी आपल्याच बाबतीत येणारा हा अनुभव आहे. […]

हवीहवीशी मनास शांती

हळूच पाऊली येते संध्या जाते बिलगत यामिनिला विलोभनिय ते प्रहर सारे चाहुल निरवतेची सांजेला…. हवीहवीशी मनास शांती मिठित घेते काळोखाला अनाहत अबोली एकरूपता कुरवाळीते जीवाजीवाला… भावगंधल्या त्या प्रीतभावनां सजवुनी जाती मनामनाला आत्मानंदी साक्षात्कार सुंदर अंतरी उधाण येते आनंदाला…. ********* — वि.ग.सातपुते (भावकवी) (9766544908)  रचना क्र. ३२६ ९/१२/२०२२

बर्फातला माणूस…

युरोपातले आल्प्स पर्वत हे भटकंतीसाठी गिर्यारोहकांत अत्यंत लोकप्रिय आहेत. ऑस्ट्रिआ, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्विट्झरलँड, इत्यादी देशांत पसरलेल्या या पर्वतरांगांत गिर्यारोहकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या आल्प्स पर्वतात भटकणाऱ्या काही जर्मन गिर्यारोहकांना १९९१ सालच्या सप्टेंबर महिन्यात, इटली आणि ऑस्ट्रिआ या देशांच्या सीमेजवळच्या योट्झाल खोऱ्याजवळ, बर्फात अर्धवट दडलेला एक मानवी मृतदेह आढळला. […]

सूर्य उद्याचा !

चढत्या रात्री द्रव सोनेरी । चषकांमधली नशा बिलंदर । मंद सानुली ज्योत सांगते । हे नच अपुले नवसंवत्सर ।। थाट चालतो माठ जिवांचा । किनाऱ्यावरी गर्दी कलंदर । पश्चिमेकडे झुकता झुकता । दिशादिशांतील वाढे अंतर ।। उगा कशाला सदा वाहता । दास्यवृत्तीची मढी खांद्यावर । रूढी तोडुनी गढी गाडता । अभिमानाने फुलेल अंबर ।। ब्रह्मध्वज हा […]

कोकणातील राजकीय परंपरा

अखंड कोकणात जसे काँग्रेसी विचारांचे प्राबल्य होते तसे समाजवादी विचारांचा भारी पगडा होता. कार्यकर्ते आणि राजकारणही विचार, निष्ठा, सामाजिक बांधिलकी यावर आधारलेले होते. परंतु त्याकाळच्या शिवसेनेतही रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातीलच कार्यकर्ते होते. शिवसेनेतही मुंबईचा पहिला महापौर होण्याच भाग्य प्रि. वामनराव महाडिकांना लाभलं होतं. तत्पूर्वी काँग्रेसच्या स. का. पाटील या मालवणी सूपूत्राची मुंबापुरीवर हुकमत होती. जवाहरलाल नेहरू यांचे स. का. पाटील यांच्याशी फार जवळीक होती. […]

सांजवेळ

बरेच काही माझे पण मालकी कुठेच नाही जीव जरी माझा तरी त्यावर सत्ता माझी नाही सारे आपुले म्हणुनी नाती हॄदयी जपत राहिलो मृगजळ होते सारे आपुले कुणीच भासत नाही प्रारब्ध भाळीचे अगदी सहजी भोगुनी झाले आता भोगण्यासारखे तर काहीच उरले नाही जगताना रोज रोज पाहतो हसरे बेगडी चेहरे पण निर्मळ प्रसन्न खरा चेहरा कुठेच दिसत नाही […]

चंद्र वर गेला

…………. गावाकडची गोष्ट……….। …हि सृष्टी निर्माण झाल्यापासून आकाश वरच असावे असे मला वाटते. या सुट्टी बद्दल व निसर्गाबद्दल अनेक माणसे वेगवेगळे सांगतात. नक्की काय इतिहास आहे हे कुणालाच माहीत नाही निसर्गातील किंवा सृष्टीतील अनेक वस्तू झाडे वेली फळे-फुले आपण नेहमी पाहतो. काही झाडांना हिरवा रंग काही फुले रंगीबेरंगी हा जो कलर आहे. त्या पेंटर चे नाव […]

गुंतवणूक नियोजन

गुंतवणूक ही उत्तम प्रकारे करणं, पैशाला कष्ट करायला लावणं हे अतिशय आवश्यक असतं. आजही आपली कुटुंबपद्धती उत्तम प्रकारे सुरू आहे. त्यामुळे आपली पुढची पिढी आपली काळजी घेतेच, पण आपली अशी अपेक्षा असते की आपला आर्थिक भार पुढच्या पिढीवर पडू नये. तसेच पुढच्या पिढीची जी स्वप्नं आहेत, त्या स्वप्नपूर्तीसाठीसुद्धा आपला हातभार लावणं ही प्रत्येकाची इच्छा असते. […]

1 2 3 4 5 6 15
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..