भाऊ भाऊ
विनय आजगांवकर माझा कॉलेजचा मित्र. कॉलेजात आम्ही सतत एकमेकांच्या सोबत असायचो. कॉलेजच्या कॅन्टिन मध्ये जाऊन हादडणं, लेक्चर्स बंक करुन पिक्चरला जाणं, मुलींविषयी बोलताना दुसऱ्या कुणालाही कळणार नाही अशा सांकेतिक भाषेत बोलणं असले नाना उपद्व्याप आम्ही दोघे एकत्रच करीत असू. विनय तेव्हा कॉलेजच्या जवळच राहात असे. विनयची आई, त्याचा मोठा भाऊ दादा आणि त्याची वहिनी हे सगळेच […]