नक्षत्रांचे देणे
कधी कधी आपल्या आयुष्यात अगदी सहजपणे एखादी फार महत्त्वाची गोष्ट आपल्याला मिळून जाते. मी असा सुखद अनुभव अनेक वेळा घेतला आहे. त्यातलाच एक अनुभव सांगतो. एकदा कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्याला गेलो होतो. दुपार रिकामी होती. सहजच संगीतकार आनंद मोडकांना फोन केला. त्यांच्यामुळेच ‘प्रभू-मोरे’ ही हिंदी भजनांची कॅसेट कशी बनली ते यापूर्वीच सांगितले आहे. पण त्यांच्याबरोबर मी कोणतेच […]