सोहळे
भिवंडीच्या धामणकर परिवाराशी आमचे दोन पिढ्यांपासून नात्याइतके जवळचे संबंध होते. प्रकाशमामा, जयश्रीमामी, शालिनीमामी यांची माझ्या पहिल्या कार्यक्रमापासून आजपर्यंतच्या कार्यक्रमांना उपस्थिती आवर्जून असते. त्यांच्यासाठी मी अनेक कार्यक्रम केले होते. एक दिवस प्रकाशमामा धामणकरांचा फोन आला. त्यांचे वडील भिवंडीचे माजी खासदार कै. भाऊसाहेब धामणकर याच्या पुतळ्याचे अनावरण करायचे होते. त्यासाठी एका समारंभाचे आयोजन ते करीत होते. माननीय नेते […]