नवीन लेखन...

जागतिक व्हिस्की दिवस

श्रावण महिना लवकरच सुरु होतोय. या महिन्यात अनेकांना मद्यपान-मांसाहार वर्ज्य असतो. त्यांच्यासाठी हा खास लेख… […]

अक्षरलेण्यांचा शिल्पकार: आप्पा महाशब्दे

आप्पा महाशब्दे यांच्या बोटांना लाभलेले वरदान केवळ बोर्डाच्या अक्षरांपाशीच घोटाळत राहिले नाही. तर कलाक्षेत्राशी निगडित असलेल्या विविध अंगांनी ते बहरून आले. विविध संस्थांच्या अनेकविध कार्यक्रमांसाठी गौरवचिन्हे, स्मृतिचिन्हे यामधील त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे. आतापर्यंत अशी हजारो स्मृतिचिन्हे त्यांच्या हातून बनली आहेत. याशिवाय बॅनर्स, बॅचेस, साइन बोर्ड्स, मानपत्रे अशा कितीतरी बाबीत आप्पांची मुशाफिरी वैशिष्ट्यपूर्ण आहे. […]

वेगळा (कथा) भाग ८

आई ने त्याला बहुतेक खूप शोधल असाव , ती आल्या पासून त्याच्या कडे फक्त रागारागाने बघत होती, सर्व झोपल्या नंतर ती त्याच्या शेजारी जाऊन बसली , बाबू ती आली हे  कळताच झोपेच सोंग घेऊन निमूट पडून राहिला, “बाबू , कुठे होतास दिवसभर “आई ने त्याच्या डोळ्यावरचा हात काढत विचारल. “वाकड ला गेलो होतो” बाबू ने कूस […]

संगीत-समारोह

माझ्या वडिलांचे क्लबमधील मित्र चंद्रशेखर टिळक हे माझ्या गाण्याचे चाहते होते. त्यांनी ‘रसधारा’ हा गाजलेल्या मराठी गाण्यांचा कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमात गाण्यासाठी त्यांनी मला बोलावले. चंद्रशेखरजींशी अनेक वर्षे आमचे घरगुती संबंध होते. मी लगेचच होकार दिला. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये पहिला कार्यक्रम झाला आणि त्याचबरोबर अनेक कार्यक्रम आम्ही केले. अनघा पेंडसे, प्रल्हाद अडफळकर, संध्या खांबेटे आणि […]

रंग

आपण आजकाल कृत्रिम रंगांचा वापर जोरात करतो आहे, तर सुरुवातीला लोक फक्त नैसर्गिक रंग वापरत असत. मोहेंजोदारो आणि हडप्पाच्या उत्खननात सापडलेल्या वस्तूंमध्ये अशी भांडी आणि मूर्ती होत्या, ज्या रंगवलेल्या होत्या. त्यांच्याकडे लाल रंगाच्या कापडाचा तुकडाही सापडला. तज्ज्ञांच्या मते, मजिठ किंवा मजिष्ठाच्या मुळापासून तयार केलेला रंग त्यावर लावला होता. हजारो वर्षांपासून, मदिथचे मूळ आणि बक्कम झाडाची साल हे लाल रंगाचे मुख्य स्त्रोत होते. पीपळ, गुलार, पाकड या झाडांवरील लाख अळीपासून महार रंग तयार केला जात असे. हळदीपासून पिवळा रंग व सिंदूर मिळत असे. […]

कोकण

कोकणी माणूस  दणक्यात होळी साजरा करून सुखावलेला असतो. चैत्राचे आगमन होते. चैत्रपालवी झाडांवर फुलू लागलेली असते.चैत्र संपून वैशाख सुरु होतो. कोकणाला उन्हाचे चटके जाणवू लागलेले असतात. मातीचा लाल रंग उठून दिसू लागतो.माती लाल,रस्ते लाल,पाणदी लाल, चिर्याची घरे लाल,  कौले  सुद्धा लाल,झाडांची पाने आपला मुळचा रंग दडवून   लाल झालेली असतात. […]

श्री स्वामी समर्थ अवतार रहस्य – अलौकिक व कर्तृत्व

अनादी काळापासून भारतीय संस्कृती ही श्री दत्त अवतारांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. त्यांच्या आत्मज्ञानाचा, ब्रह्मज्ञानाचा संजीवन प्रवाह विश्वाच्या स्पंदनातून, चराचरातुन अखंड अविरतपणे धर्मरक्षणासाठी कार्य करीत आहे. श्री. दत्तात्रेयांचा पहिला अवतार सत्ययुगात महान तपस्वी श्री. अत्रीऋषी आणि महापतिव्रता साध्वी श्री. अनसुया यांच्या तपोबलामुळे झाला. व तो अखंड, शाश्वत. चिरंतन अवतार असल्याने त्याच परंपरेत त्यांचा अवतार मानले जाणारे […]

कावळे (कथा) – भाग 4

वासंतीला जाऊन आता पंधरा वर्ष होऊन गेलीत. बरेच वर्षांनी परवा एक बिल्डर आला होता. चांगला गल्लेलठ्ठ होता! उंचापुरा, दोन्ही हाताच्या बोटात हिऱ्याच्या अंगठ्या, पांढरा शुभ्र सफारी सूट, गळ्यात जाड सोनसाखळी, हातात हिऱ्यांच्या पट्ट्याचे घड्याळ, चकचकीत बूट, खिशाला हिऱ्याच्या क्लिपचे पेन…. श्रीमंतीचा दिमाख अगदी उबग आणण्याजोगा! आपली आलिशान गाडी सफाईने पायऱ्यापर्यंत आणून तो खाली उतरला आणि जणू […]

कुसुमाग्रजांना श्रद्धांजली

काजव्यांच्या कोलाहलातून भव्य तारा निमाला धरित्रीच्या कुशीमधून आसमंतात झेपावला कोंडलेला श्वास मुक्त झाला, उजाडलं घर अंगण सुनंसुनं झालं सुन्न, उसासलं अवघं तारांगण विध्दलेलं रुद्ध शब्द, श्वास का हा जडावला दाटली श्रद्धा ओठी, डोळ्यांकाठी मोतीहार निखळला – यतीन सामंत

भारतमातेच्या वीरांगना – ३३ – लीला नाग रॉय

आपल्या शिक्षणासाठी करावा लागलेला झगडा बघून त्यांना त्यांच्या कामासाठी क्षेत्र निवडणे सोपं झालं. त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी काम करायचे ठरवले आणि स्वतःला झोकून देऊन समाजसेवेचे हे व्रत हाती घेतले. नुसतेच पुस्तकी शिक्षण नाही तर शारिरिक शिक्षणावरही त्यांनी भर दिला. मुलींनी स्वतःच्या रक्षणार्थ इतरांवर अवलंबून राहणे त्यांना मान्य नव्हते. १९२१ सालच्या बंगाल मधील भीषण पुराच्या काळात, ढाका महिला मंडळ स्थापन करून, त्याच्या मार्फत नेताजींना भरपूर पैसा गोळा करून दिला. […]

1 104 105 106 107 108 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..