नवीन लेखन...

एअरपोर्ट

प्रवेशद्वाराजवळ परदेशी जायला निघालेल्या प्रवाशांची आप्तेष्ट मंडळी ताटकळत उभी होती. आपला जीवलग परदेशी निघाला, आता त्याचं सहा महिने, वर्षभर किंवा कदाचित त्याहूनही अधिक काळ दर्शनही होणार नाही या विचारांनी उमललेली व्याकुळता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. […]

संगमी सांगता

शांत, शीतल गर्द किनारा संथ लहरी प्रवाही सरिता खळाळते प्रतिबिंब नभाचे मनी उचंबळते प्रीतसरिता आठवांची, झालर झुलते थकली जरी ही गात्रे आता अंतरी, स्मृतींची गंगायमुना अखंड वाहते पावन सरिता निर्मोही भावनांची भावगंगा जागविते, हॄदयी भावगीता भावप्रीतीचे, सरोवर सुंदर मिलना, आतुरलेली सरिता तृप्ततेचा साक्षात्कार लाघवी सागरसरिता, संगमी सांगता — वि.ग.सातपुते. (भावकवी) 9766544908 रचना क्र. १५० ११ – […]

वेगळा (कथा) भाग ६

अनिल बाहेर येताच इतक्या वेळ बडबड करत असलेल्या अशोक ची तंतरते, त्याला पुढे काही बोलायचं सुचतच नाही तो नुसता अनिल आणि बायडा कडे आळीपाळीने बघत राहतो. “अरे ये गयबान्या, काय बोल्ला तू , बाबूच काय “अनिल आता जवळ जवळ अशोक च्या अंगावर येऊ लागतो. “काय बाबू च , बाबूच काय नाय, कोण बोल्ल बाबू,  तो तर , […]

‘स्वर-मंच’ची जडणघडण

या नंतरचा काही काळ मात्र मी स्वर-मंच म्युझिक अॅकॅडमीच्या जडणघडणीसाठी दिला. सुगम संगीताचे सर्व प्रकार मी शिकवत होतो. पण रागदारी संगीत, हार्मोनियम, तबला, गिटार अशी अनेक वाद्ये शिकण्यासाठी लोक चौकशी करायला लागले. माझ्या काही निपुण विद्यार्थ्यांनाच मी शिक्षक बनवले. अल्पावधीतच श्रीरंग टेंबे, सागर टेमघरे, प्रज्ञा टेंबे, मनिषा शहा, मनोज कांबळे, समीर टेमघरे, अमेय ठाकूरदेसाई, कुलकर्णी असे […]

देवभूमीतील पंचबद्री  – विशालबद्री किंवा बद्रीनाथ – भाग 2

हे मूळ मंदीर कोणी व कधी बांधले याचे उल्लेख सापडत नाहीत. पण मिळालेल्या एका शिलालेखानुसार हे मंदीर २५०० वर्षांचे पुरातन आहे असा एक अंदाज निघतो. शंकराचार्यांनी या मंदिराचा बद्रीनाथाची मूर्ती स्थापन केल्यावर जीर्णोद्धार केला असावा. आजचे हे मंदीर कत्युरी राजाने बांधले व तिथे पूजा-अर्चा सुरू केली. त्यासाठी मंदिराला त्यांनी काही जमिनी इनाम दिल्या, असे काही संशोधकांचे […]

चिकमावगा (ॲम्ब्रोज बिअर्स याची एक कथा)

तरूण असतांना त्याचा बाप सैनिक म्हणून पाशवी जमातींशी लढला होता व त्याने देशाचा झेंडा दूरवर फडकवला होता. मळ्यावरच्या शांत जीवनांतही त्याच्यातल्या सैनिकाची धग जिवंत होती कारण एकदा पेटलेला तो अंगार कधीच विझत नाही. त्याला युध्दाची चित्रे असलेली पुस्तक आवडत आणि ती पाहून मुलालाही इतकी समज आली होती की त्याने लाकडी फळीची तलवार केली होती; अर्थात वडिलांना कदाचित ती तलवार वाटली नसती. आता तो मुलगा त्याच्या शूर जमातीला शोभेशा धीटाईने ती तलवार हातात धरून थांबत, हवेत फिरवत, पवित्रे घेत चालला होता. त्याला सहजतेने ह्या अदृश्य शत्रुंवर विजय मिळत होता. त्यामुळे त्याने शत्रुचा पाठलाग करत पुढे पुढेच जात रहाण्याची, सर्व सेनांनीकडून नेहमीच घडणारी, चूक केली आणि तो एका उथळ ओढ्याच्या कांठावर येऊन पोहोचला; त्याच्या कल्पित शत्रुने तो ओढा सहज वाऱ्याच्या गतीने पार केला होता. समुद्र पार करणाऱ्या त्याच्या जमातीची विजिगीषु वृती त्याच्याही लहानशा हृदयात धडधडत होती. त्याने त्यात मोठे दगड वगैरे शोधून काढून त्यांच्या आधाराने धडपडत तो ओढा ओलांडला व परत शत्रुचा पाठलाग सुरू केला. […]

भारतमातेच्या वीरांगना – ३१ – ननीबाला देवी

एक क्रांतिकारी श्री रामचंद्र मजुमदार एकदा तुरुंगवासात होते, अटक झाली तेव्हा ते आपल्या जवळचे पिस्तुल कुठे लपवले आहे हे आपल्या सहकाऱ्यांना सांगू शकले नाही. ननीबाला देवींने प्रवाहा विरुद्ध जायचे ठरवले. त्यांनी श्री रामचंद्र मजुमदार ह्यांची पत्नी बनून त्यांना भेटायला जाणे सुरू केले. हळूच बोलण्यातून त्यांनी माहिती पुरवली आणि ननीबाला देवींनी ती माहिती योग्य व्यक्तीपर्यंत पोचती केली. […]

ठाण्याचा कलादूत: नरेंद्र बेडेकर

आय.सी.सी.आर. तर्फे भारत सरकारचा सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून नरेंद्रने जपान, रशिया, मॉरिशस, इंडोनिशिया येथे भारतीय कलापथकाचे नेतृत्व केले आहे. प्रजासत्ताकदिनाच्या परेडमध्ये ठाणे जिह्यातील आदिवासी कलावंतांचे पथक नेऊन ठाण्याची आणि महाराष्ट्राची ही मान उंचावण्याचे काम नरेंद्रने केले आहे. […]

घनमेघ

बरसत, बरसत ये रे घना चिंब चिंब भिजव रे मना आसक्त,अधीर प्रीतभाव बरसत, बरसत ये रे घना सांग कसे, मीच रे सावरुं हे निळ्या सावळ्या घना तुझ्यात रे स्पर्षतो सावळा बरसत, बरसत ये रे घना हेच गगन, हीच वसुंधरा उताविळ, मिलना रे घना तूच रे, चैतन्य या सृष्टिचे ये सजवित ब्रह्मांडा रे घना — वि.ग.सातपुते (भावकवी) […]

वेगळा भाग – ५

अशोक सोबत झालेल्या त्या बोलण्यामुळे बाबू पुढचे काही दिवस अशोकला भेटलाच नाही , शाळेत जरी तो त्याला दिसला तरी तो त्याला टाळू लागला, एकटा शाळेत येऊ जाऊ लागला. संध्याकाळ चा बराच वेळ दत्त मंदिरात घालवू लागला .त्या दिवसानंतर मात्र अशोक आणि आपल्यात खूप फरक आहे , त्याचे आणि आपले विचार हे खूप वेगळे आहेत, अशोक आपला […]

1 106 107 108 109 110 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..