एक परीस स्पर्श… ( भाग -२९ )
तो रस्ता काढत काढत त्या माडीच्या दरवाज्यापर्यत पोहचतो तो दरवाज्यात पोहचताच आपोआप माडीचा दरवाजा उघडतो…तो आत जातो तर आत अतिशय सुंदर खोली असते…त्या खोलीत मस्त अत्तराचा सुगंध दरवळत असतो… पण त्या खोलीत कोणी नसते म्हणून तो जिना चढून पहिल्या मजल्यावर जातो तर तिथे सुंदर स्वयंपाक घर असते…तेथेही कोणी नसते…दुसऱ्या मजल्यावर देवघर असते, तिसऱ्या मजल्यावर शयन कक्ष असते. चौथ्या मजल्यावर बैठकीची खोली असते…पाचव्या मजल्यावर वाचनालय असते…सहाव्या मजल्यावर…मोकल्या जागेत फक्त सतरंजी अंथरलेली असे पण तेथेही कोणीच नसते शेवटी तो सातव्या मजल्यावर पोहचतो तर तेथे एक दाढी वाढलेले साधू महाराज ध्यानाला बसलेले असतात. तो राजकुमार जाऊन त्यांच्या पाया पडतो… […]