गाण्याचा पहिला परदेश दौरा
आत्तापर्यंत संपूर्ण देशभर हिंडून मी गायलो होतो. भारताबाहेर कार्यक्रम सादर करण्याची माझी इच्छा होती. त्या दृष्टीने मी प्रयत्नही केले होते, पण एक अडचण येत होती. काही कार्यक्रमाचे दौरे काही महिन्यांचे होते. इतके दिवस कंपनीची कामे थांबवून देशाबाहेर राहणे मला अशक्य होते. गायिका रंजना जोगळेकरबरोबर अमेरिका दौऱ्याची संधी देखील आली होती. पण तो दौराही अडीच महिन्यांचा असल्याने […]