रामदास बोट बुडली
१७ जुलै १९४७ चा तो दिवस. मुंबईहून सकाळी आठ वाजता रेवसकडे जाण्यास निघालेली ‘रामदास’ बोट मुंबई बंदरापासून अवघ्या ९ मैलांवर असलेल्या ‘काश्या’च्या खडकाजवळ प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे कलती होऊन समुद्रात बुडाली. तिच्याबरोबर त्या बोटीने प्रवास करणा-या सुमारे हजारभर प्रवाशांपैकी सुमारे ६२५ जण समुद्रात बुडून मरण पावले. या भीषण दुर्घटनेतून २३२ उतारूंचा सुदैवाने जीव बचावला. त्यात रामदास बोटीचा कप्तान शेख सुलेमान हा होता. […]