कावळे (कथा) – भाग 1
उपनगरातील भर वस्तीत, आजूबाजूला नवीन नवीन भव्य काँक्रिटच्या इमारतींच्या गराड्यात हा आमचा एकमेव बंगला, वासंती व्हिला’. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या डोळ्यात भरल्याशिवाय रहात नाही. एखादं मरायला टेकलेलं जनावर, कधी मरतंय याची वाट पाहत, आजूबाजूच्या परिसरात, कावळे वाट पाहत बसतात तसे ‘बिल्डर’ नावाची आधुनिक कावळे जमात या बंगल्यावर डोळा ठेवून आहे. अर्थात मी चांगला खमक्या आहे आणि जोपर्यंत मला […]