‘कवितेचे झाड’
शब्दांचे पक्षी येऊन बसतात भावनांनी लदबदलेल्या वाक्यांच्या फांदीवर तेंव्हा सुरु झालेला असतो. कवितेचा किलबिलाट पानांपानांच्या आडून…मुळासहित सगळ्या झाडाचे कान अधिर होऊन जातील काही क्षणातंच..स्तब्ध होऊन आकाश ही विसावेल क्षणभर ढगांसहित…हळूहळू..उतरत जाईल कविता कागदावर..मेघातून झिमझिम बरसणाऱ्या पावसाच्या थेंबाप्रमाणे.. कोंब फुटतील शब्दांना मनाच्या मऊ-मऊ मातीत खोल..वर येण्यासाठी संघर्ष होईल मातीशी.अंगातले सारे बळ एकवठून वाट काढत शिरावे लागेल मातीच्या […]