गोजिरा माळिते गजरा
पेडर रोडवरची आकाशगंगा ही वीस मजली आलिशान इमारत. त्यात तेराव्या मजल्यावर फ्लॅट नंबर तेरामध्ये ‘मिळून साऱ्या सया’ या आंतरराष्ट्रीय कीर्तिच्या भारतीय महिला संघटनेच्या कार्याध्यक्ष सौ. चारू चिटे राहतात. ‘चाची’ या टोपणनावाने त्या स्त्रियांच्या समस्या, प्रश्न, आंदोलने यावर लेख, कथा, पुस्तके, प्रबंध (विशेषकरून इंग्रजी दैनिके, साप्ताहिके, मासिके) लिहितात. मराठीतील अग्रगण्य दैनिक ‘रोजची पहाट’ चे संपादक सूर्याजी रवीसांडे, […]