नवीन लेखन...

देवतात्मा  हिमालय  – भाग 3

हिमालयाचे अनेक तऱ्हेने वर्णन करून सुद्धा कालिदासाला ते अपूर्ण वाटते. आपली प्रतिभा शक्ती हिमालयाचे वर्णन करू शकत नाही ह्याची त्याला खंत वाटते व तो हिमालयाला शरण जातो व आपल्या न्यूनत्वाची जाणीव करून देताना म्हणतो: स्थानो त्वां स्थावरात्मानम विष्णुमाहुस्तथाहि ते । चराचराणां भुतानाम् कुक्षिराधारतां गता ।। प्राचीन संचितामध्ये हिमालय काव्यप्रेरक व काव्यप्रसुही ठरला आहे. पाणिनीनेसुद्धा आपल्या रचनांत […]

एका व्यस्त दलालाची प्रेम-कथा

चेटकिणीचे पाव, निवडुंग, स्कायलाईट रूम, समृध्द प्रेमाची भेट आणि आता ही व्यस्त दलालाची प्रेमकथा, सर्वच प्रेमाबद्दलच्या कथा. सर्व कथांमधे वळणं आणि अनपेक्षित शेवट आहे परंतु प्रत्येक कथा दुसऱ्याहून वेगळी आहे. ओ हेन्री कथाकार म्हणून प्रसिध्द झाला, त्या कल्पनांवर अनेक, नाटके, चित्रपट, मालिका केल्या गेल्या ह्यांत नवल नाही. ह्या कथेत आनंदी शेवटही किती वेगळ्या प्रकारे सादर केलाय. […]

पर्यटनातही स्वयंपूर्णतेकडे

भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ अशी घोषणा देऊन भारताचे तेज, भारताचे आत्मभान जागृत करण्याचा प्रयत्न केला आणि स्वाभाविकच सर्वांचेच लक्ष भारताची ओळख, भारताची संस्कृती जगात पोहोचवणाऱ्या पर्यटन या क्षेत्राकडे वळले. त्याही क्षेत्रात आपण आत्मनिर्भर कसे होऊ शकतो याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न. […]

अभंग:आत्म्याचे चिरंतन तत्त्व

‘ब्रह्मविद्येचा सुकाळ’ करणारे संत ज्ञानदेव आणि ‘हरिनामाचा सुकाळ’ करणारे संत नामदेव या दोन श्रेष्ठ संतांभोवती अवघं संतवाङ्मय अखंड वीणेसारखं झंकारत होते. तेराव्या शतकाच्या उत्तरचरणात प्रगट झालेल्या या दोन साक्षात्कारी संतांनी ‘अभंग’ रचनेला प्रथम सुरुवात केली आणि शाश्वत मराठी कवितेची ‘अभंग’वाणी अवकाशभर निनादू लागली. उन्हाचे चांदणे करणारे हे दोन अद्भुत महाकवी अभंग वाङ्मयाचे केवळ निर्माते नव्हते, तर […]

भारतमातेच्या वीरांगना – 17 – अवंतीकाबाई गोखले

पहिल्या गोलमेज परिषदेवर भारताने बहिष्कार टाकला आणि त्यानंतर २६ ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर ध्वजारोहण करण्याचे ठरले. अवंतीकाबाई १३ व्या तुकडीचे नेतृत्व करत होत्या. त्यांनी सकाळी ८.१५ ला ध्वजारोहण केले. दुसऱ्या दिवशी पालिकेच्या सभेला हजर असतांना त्यांना अटक झाली आणि ६ महिने कैद व ४०० रुपये दंड करण्यात आला. […]

आजी आजोबांचे आरोग्य – भाग ६

२२) मांसाहार करावा की नाही? (Is non-veg good): जगात एकूण लोकसंख्येपैकी फक्त १० टक्के लोक शाकाहारी आहेत. हे प्रमाण खरोखर आश्चर्यकारक आहे. भारतात सुमारे ३९% शाकाहारी आणि ८१% मांसाहारी आहेत. वार्धक्याचा विचार करता, धातूंचा क्षय अधिक असतो म्हणून त्यांना पोषक प्रथिनांची गरज तुलनेने जास्त असते. म्हणून आठवड्यातून एक वेळा मांसाहार घेण्यास हरकत नाही. मात्र मांसाहार शक्यतो […]

राष्ट्रवाणी

वाजपेयींची मृदूवाणी अडवाणींची अडवाणी संघाची एक वाणी भाजपची केविलवाणी सोनियांची सोन वाणी राष्ट्रीयांची टंगळ मंगळ वाणी लालूची बडबड वाणी मायावती ची माया वाणी मुल्ला मुलायमची मुलायम वाणी ललिताची धमकावणी प्रमुखांची गुरकावणी ममताची रुसु बाई वाणी पडद्याआडची चंद्रावाणी वीरप्पन ची मिशाळवाणी दाऊदची आतंकवाणी मुशर्रफ मग्रूरवाणी बुशची धमकावणी सद्दाम ची उद्दाम वाणी सारी बोल घेवड्यांची वाणी सारी वाचीवीरांची वाणी काही […]

मराठमोळ्या फार्सचे जनक: श्याम फडके

त्यांच्या फार्सचे त्या काळी व्यावसायिक रंगभूमीवर खूप प्रयोग झाले आणि हौशी रंगभूमीवर त्याहीपेक्षा कितीतरी जास्त प्रयोग झाले. हौशी नटमंडळींना सुद्धा त्यांच्या सुटसुटीत फार्सचे असंख्य प्रयोग करावेसे वाटले. महाराष्ट्रातल्या छोट्या-छोट्या गावात आणि उत्सवात गल्लीबोळातही श्याम फडक्यांची नाटके होत होती. […]

वाटचालीला प्रारंभ

या कार्यक्रमाचा, या प्रसिद्धीचा थोडा परिणाम दिसायला लागला. मला केलेले कमी बजेटचे कार्यक्रम माझ्यासाठी खूपच मोठे होते. लोकांना माझे गाणे आवडते आहे, याची ती पावती होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे कार्यक्रम मला आयोजित करायचे नव्हते, तर त्यात मला फक्त गायचे होते. एक मोठा डोंगर चढून आल्यावर सपाट रस्त्यावर चालण्यासारखेच हे होते. फक्त एक गोष्ट हळूहळू […]

खीर आणि बासुंदी

सर्वसाधारणपणे सिनेरसिकांना, या दोघींमध्ये सुश्मिता आवडते. कारण ती आपल्यातील वाटते. उलट ऐश्वर्या ही सुंदर असली तरी एखाद्या कचकडी बाहुलीसारखी वाटते. तिचं सौंदर्य हे संगमरवरी पुतळ्यासमान वाटतं.. सुश्मिता ही हाडामासाची रेखीव शिल्प वाटते.. शेवटी काय, दोघीही गोडच आहेत.. एक पुन्हा पुन्हा घ्यावी अशी खीर, तर दुसरी तब्येतीला जपून मागावी, अशी बासुंदी!! […]

1 122 123 124 125 126 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..