गायिका मंजुश्री ओक
पुण्यातील गायिका मंजुश्री ओक यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये १२२ भारतीय भाषांमधील गाणी सलग १३ तासांच्या कार्यक्रमात सादर केली. भारतात बोलल्या जाणाऱ्या ७८० भाषांपैकी अनुसूचित (शेड्युल्ड) असलेल्या २२ भाषा, नॉन शेड्युल्ड प्रकारच्या ३४ भाषा, तसेच उपभाषा, बोलीभाषा व मातृभाषा प्रकारातील ६४ भाषांमधील गीते या कार्यक्रमासाठी निवडण्यात आली होती. महाराष्ट्रातील आदिवासी भाषांमधील काही नवीन गाण्यांचाही अंतर्भाव करण्यात आला होता. ईशान्य भारतातील दुर्लक्षित ४१ भाषा, तसेच काश्मीरमधील व अगदी निकोबारी भाषेचाही यात समावेश होता. […]