लोककलावंत प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे
अनुराग कश्यप दिग्दर्शित हिंदी चित्रपट शैतान मध्ये पिंट्याची हंडी फुटली हे गाणे,संजय लीला भंसाली दिग्दर्शित बाजीराव मस्तानी चित्रपटातील गाणे त्यांनी गायले आहे . […]
अनुराग कश्यप दिग्दर्शित हिंदी चित्रपट शैतान मध्ये पिंट्याची हंडी फुटली हे गाणे,संजय लीला भंसाली दिग्दर्शित बाजीराव मस्तानी चित्रपटातील गाणे त्यांनी गायले आहे . […]
उन्हाळी सुट्टीत गावी गेल्यावर पुण्यात यायला जून उजडायचा.. पहिला वळीव पाऊस अनुभवताना, अतोनात आनंद मिळायचा. त्या पावसात गाईचं वासरुं शेपटी वर करुन हुंदडताना पाहिलेलं आठवतंय.. पाऊस उघडल्यावर सवंगड्यांसोबत हनुमान झऱ्यातून खेकडे पकडायला लांबवर गेलेलो आहे.. शेतातून चालताना चिखलाचा थर, जाडजूड चप्पल घातल्यासारखा पावलांना लागायचा… […]
छत्रपती शिवाजी महाराज श्रीसमर्थांच्या आज्ञेप्रमाणे साधन करत. कोणत्याही ऐहिक विषयाच्या ठिकाणी त्यांची वासना नव्हती. पण श्रीतुळजाभवानीने दिलेल्या भवानी तलवार ह्या हत्यारात मात्र ती शिल्लक होती. म्हणूनच भवानी तलवार त्यांनी श्रीसमर्थांपुढे ठेवून नमस्कार केला व त्यांची आज्ञा घेतली. […]
‘फिल्म सोसायटी’ ही संकल्पना मराठी रसिकांना १९६८ साली पूर्णत: नवी होती. आम्ही ‘प्रभात चित्र मंडळ’ स्थापण्याचा बेत आखला, पण आम्हाला तरी त्यामागील मूळ विचार कोठे स्पष्ट होता? तो जसजसा उलगडत गेला तेव्हा लाभलेली जाणीवसमृद्धी हा मात्र आयुष्यभराचा ठेवा झाला आहे. […]
त्यांनी शिक्षण, शेती वगैरे बाबतींत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या. विशेषतः पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे श्रेय त्यांच्याकडे जाते. […]
दामले आणि फत्तेलाल यांनी मिळून १९३६ मध्ये ‘संत तुकाराम’ हा बोलपट दिग्दर्शित केला. सर्व भारतभर हा बोलपट झळकला व या बोलपटाने नाव कमावले. हा बोलपट मराठी भाषेत असला तरी भाषेची अडचण कुठेही न येता भारतातील सर्वभाषिक प्रेक्षकांनी त्याला उत्तम दाद दिली. ‘संत तुकाराम’नंतर दामले-फत्तेलाल यांनी ‘संत ज्ञानेश्वर’ (१९४०), ‘गोपाळकृष्ण’ (१९४०) आणि ‘संत सखू’ (१९४१) असे चित्रपट दिग्दर्शित केले.‘संत तुकाराम’ हा चित्रपट व्हेनिस फिल्म फेस्टिवलला पाठवला होता. त्या प्रसंगी तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असा त्याचा सन्मान झाला. […]
उपहास, माझे नाव रमाकांत वालावलकर, नवऱ्याचे संगोपन, प्रेमाची देणीघेणी, मोठ्या माणसांच्या गमतीदार गोष्टी, पन्नास वर्षांत मुंबई समुद्रात बुडेल, स्वयंसूचना, आटपा रे आटपा लवकर, पोटिमा (पोटावर टिचकी मारा), हसत खेळत मनाची ओळख अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. […]
त्यांचं ‘मातीची चूल’ हे आत्मचरित्रही स्पष्ट आणि रोखठोक विवेचनामुळे चर्चिलं गेलं. लहान मुलांसाठी त्यांनी ‘इसापनीती’ आणि ‘हितोपदेश’सारखी पुस्तकं लिहिली. ‘नरेंद्र : रुक्मिणी स्वयंवर’ हे नाटकही त्यांच्या नावावर आहे. […]
लता मंगेशकर हा त्यांचा विक पॉइंट. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील सर्व गायक-गायिकांच्या गाण्यांचे पारायण तर ते त्या वेळी करतच होते, पण लता मंगेशकरांच्या गाण्यांसाठी मनाचा एक कोपरा कायम राखून ठेवलेला होता. […]
‘रोजची पहाट’ या लोकप्रिय दैनिकाचे संपादक, विशेषांक सम्राट श्री. सूर्याजीराव रविसांडे आपले प्रमुख वार्ताहर, मुलाखतज्ञ श्री. काका सरधोपट यांची फार आतुरतेने वाट पाहत होते. कुणाचीही आणि कसलीही मुलाखत असो तिची चुटकसरशी वाट लावण्यात म्हणजे आटोपण्यात काकांचा हातखंडा होता. सध्या ऐरणीवर असलेल्या धडाकेबाज ज्वलंत समस्येवर साधकबाधक चर्चा करणारा असा एक धडाकेबाज दिवाळी विशेषांक काढायची सूर्याजीरावांची योजना होती. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions