नवीन लेखन...

वंदनीय बाबासाहेब आंबेडकर

वंदन वंदन त्या विभूतीला.. मानवतेच्या महामानवाला..।। धृ ।। जो जाणतो अर्थ मानवतेचा.. मानव! एकच धर्म मानवी.. सर्वाठायी एकची आत्मा.. वंदन वंदन त्या विभूतीला..।।..१ विवेकीनिधर्मी,चारित्र्यागृही.. स्पृश्यास्पृश्यतेचा, विरोधक.. जगती, मानवतेचाच पुजारी.. वंदन, वंदन त्या विभूतीला..।।..२ प्रज्ञावंती, नितीज्ञ तो सहिष्णू.. मानवी संस्कृतीचा अध्यापक.. बुद्ध! आगळाच परिवर्तनाचा.. वंदन, वंदन त्या विभूतीला..।।..३ भारतीय संविधानाचा उद्गाता.. जगतवंद्य! हा श्रेष्ठमहामानव.. अमर, देशभक्त भारतभूमीचा.. […]

“जादू ssss तेरी नजर, खुशबू तेरा ssss बदन, तूं हां…..”

सॉरी, सॉरी, मंडळी, माफ करा मला ! आपण म्हणाल यात माफी मागण्या सारखं तुम्ही काय केलंय, म्हणून माफी मागताय ? सांगतो, सांगतो मंडळी. त्याचं काय आहे, मला खरं तर “जादू तेरी नजर” या, मतकरींच्या एका नाटकाच्या नावाने आजच्या लेखाची सुरवात करायची होती. पण वरच्या गाण्याच्या ओळींची “जादू” आज इतक्यावर्षांनी देखील, माझ्यासकट तमाम रसिकांवर त्या गाण्यातील शब्दांचे […]

मानसिक विकृतीचे लक्षण…!

राज्यपालांनी यापूर्वीही शिवाजी महाराजांचा तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला आहे. एका वर्षात या राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला चार वेळेस दुखावले आहे. […]

कोकणी माणसाचे इरसाल नमुने

इथल्या निसर्गाने इथल्या माणसाला कणखरपणा दिला, त्याच्या मनगटात कर्तृत्व गाजवण्याची ताकद दिली. इथल्या मातीतले अनेक नमुने आपापली छाप लोकांच्या मनावर कोरून गेले. पालघर पासून ते कुडाळ पर्यंत अनेक लोकांना भेटता आलं आणि एक गोष्ट जाणवली की इथला प्रत्येक माणूस ही एक स्वतंत्र संस्था आहे. प्रत्येकाच्या जगण्याच्या तर्‍हा निराळ्या, जगण्याचे संदर्भ निराळे, त्याच्या सुखाच्या कल्पना निराळ्या. […]

भावनांचा पाझर

गहिवरलेल्या अव्यक्ताला भावनांचा फुटतो पाझर भेटीसाठी आसुसलेले शब्दशब्द होती अनावर उलघाल अधरी मौनाची नेत्री दाटुनी येते अंबर सावळबाधी धूसर सारे कातरवेळ कातर कातर व्यथा मनीची बावरलेली तरी प्रसवते काव्य सुंदर शब्दाशब्दांची ओढ़ लाघवी सुखावतो हा जीव निरंतर ********* — वि.ग.सातपुते (भावकवी) (9766544908)  रचना क्र. ३०७ २६/११/२०२२

अर्थशास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आपण आपल्या आवडत्या अभिनेत्याप्रमाणे आवडत्या नेत्यालाही कोणत्या ना कोणत्या साचात बंदिस्त करायला आपण व आपला समाज आतुर असतो. त्यामागचे कारण म्हणजे सर्वच पातळीवर त्याबाबतचे अज्ञान  किंवा बौद्धिक आळस. एकदा का आपल्या आवडत्या साच्यात त्यांना बसवले की, त्याच्या स्वतंत्र विचारशक्तीची वा आकलनाची गरज आपल्याला वाटत नाही. खरं तर आपले डोके चालवून आकलन करून घ्यायची वेळ येऊ नये, यासाठीच तर आपला आग्रह आणि अट्टाहास असतो. अशा साचेबद्ध रचनेत सर्वात जास्त अन्याय झालेले महापुरुष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. […]

आठवतो का काळ ही भावनो

आठवतो का काळ ही भावनो? काय काळ होता राव तो पहाटे पासून गाणी लावायला सुरवात होयची ती रात्री पर्यंत गाणी असायची , […]

उगाच काहीतरी – २५

बाईकवर असताना फोनची रिंग वाजते. आपण घेत नाही, परत वाजते काहीतरी महत्त्वाचे असेल म्हणून आपण गाडी बाजूला घेतो. रेनकोटच्या आत ट्राउझरच्या खिशात ठेवलेला मोबाइल बाहेर काढतो. घरून दोन मिस्ड कॉल्स आलेले असतात. लगोलग दोन कॉल्स म्हणून आपण थोडे धास्तावतो म्हणून मग हेल्मेट काढून किंवा वर करून फोन डायल करून कानाला लावतो. रींग वाजत असते आणि मग […]

ऑनलाईन लूट

ही घटना आहे कोरोना काळातील. त्यावेळी अत्यावश्यक सेवा म्हणून बँका नेहमीप्रमाणे पूर्णवेळ नसून काही तास म्हणजेच दुपारी 2 वाजेपर्यंत चालू असायच्या. दुपारी साधारण पावणेदोन वाजता 30 ते 35  वयाची एक महिला बँकेत आली. त्यांच्या प्रश्नांवरून त्यांना बँकेच्या व्यवहाराबद्दल तशी जास्त माहिती असलेली दिसत नव्हती. त्या महिलेला त्यांच्या बहिणीला अर्जंट रु. 5000/- पाठवायचे होते असे त्यांच्या सांगण्यावरून […]

अव्यक्त गूढ

न बोलताच ती निघुनी गेली मी उमजायचे उमजूनी गेलो कळलेच नाही तीचे वागणे आठवणीत मी जगत राहिलो घडायचे ते ते घडुनी गेले मौनाचा अर्थ मी लावित गेलो तिच्याच लोचनी भाव नि:शब्दी मी उमजायचे उमजूनी गेलो पराधीनता हा शाप जीवनी व्यर्थ जगणे जगी जगत राहिलो आज अव्यक्ताचे गूढ उकलले हेच समाधान मानित राहिलो ********* — वि.ग.सातपुते (भावकवी) […]

1 11 12 13 14 15 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..