काळ्या पैशांतून, गोरा स्वर्ग
अठ्ठावन्न वर्षांपूर्वी राज कपूरने ‘संगम’ चित्रपटाची निर्मिती केली.. प्रेमाच्या त्रिकोनाची कहाणी, आपल्या खास शैलीत सादर केली. चित्रपटात स्वित्झर्लंड येथे राज कपूर व वैजयंती माला यांच्यावर एका इंग्लिश गाण्याचे चित्रीकरण केलेलं आहे. हा चित्रपट सुरुवातीला तीन तासांचा होता. त्याला दोन मध्यंतरं होती. यातील सर्वच गाणी अप्रतिम, त्यामुळे हा चित्रपट एकदा पाहून कुणाचंही समाधान होत नाही.. प्रेक्षकांनी अक्षरशः या चित्रपटाची पारायणं केली.. चित्रपट यशस्वी झाला व राज कपूरने, त्या पैशातून पुण्यामध्ये लोणीजवळ, राजबाग खरेदी केली. […]