भारतमातेच्या वीरांगना – 9 : कनकलता बारुआ
२० सप्टेंबर १९४२ साली तेजपूर पासून ८२ किलोमीटर दूर गहपुर च्या पोलीस ठाण्यावर तिरंगा फडकविण्याचे निश्चित करण्यात आले. सकाळी आपली घरातल्या कामाची सगळी जबाबदारी पूर्ण करूनच कनकलता घराबाहेर पडल्या. त्या आत्मबलिदानी दलाची सदस्य होत्या ज्यात सगळेच तरुण/तरुणी होते. कनकलता त्यांचे नेतृत्व करत होत्या. ह्या आंदोलनाच्या नेत्यांच्या मनात शंका उत्पन्न झाली की कदाचित पुढे येणारे संकट पाहून हे तरुण पळून जातील, आपल्या नेत्यांच्या मनातल्या शंकेला कनकलताने तात्काळ ओळखले आणि जोरदार गरजली, ‘आम्हा तरुणींना अबला समजू नका, शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे, करेंगे या मरेंगे’, स्वातंत्रता हमारा अधिकार है’ […]