नवीन लेखन...

सूत्रसंचालक, अभिनेते, दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे

शिक्षण घेत असताना एकपात्री, मिमिक्रीच्या माध्यमातून स्वतःतील कलाकार कायम जिवंत ठेवला. ते स्वत: चांगले गातात, दिग्दर्शन करू शकतात, चित्रकार काढतात, अभिनया व्यतिरिक्तच्या या गोष्टी फारच कमी लोकांना माहीत आहेत. “महाराष्ट्राचा सुपरस्टार’, “फू बाई फू’, “होम मिनिस्टर’, “दुभंग’ (मराठी चित्रपट) आणि चला.. हवा येऊ द्या”असा त्यांचा प्रवास आहे. […]

दिग्दर्शक दत्ता केशव कुलकर्णी उर्फ दत्ता केशव

दत्ता केशव यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘अति शहाणा त्याचा.’ (१९६७) त्या वेळेस हा चित्रपट मराठी आणि भोजपुरी भाषेत करण्यात आला होता. पुढे ‘बायांनो नवरे सांभाळा’ हा चित्रपट १९७४-७५ साली प्रदर्शित झाला. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन दत्ता केशव यांचे होते. ‘पिंजरा’नंतरचा हा मराठी रंगीत चित्रपट होता. […]

हास्य अभिनेता नूर मोहम्मद चार्ली

स्टूडियो सिस्टम जेव्हा बंद होऊ लागली तेव्हा नूर मोहम्मद चार्ली हे ४० च्या दशकात पृथ्वीराज कपूर व दुर्गा खोटे यांच्या सारखे फ्री लान्सीग करू लागले होते एवढी त्यांना मागणी होती. एक काळ असा होता की नूर मोहम्मद चार्ली यांच्या नावावर चित्रपट चालत असे. […]

फिल्मकार सईद अख्तर मिर्जा

१९९५ साली त्यांनी आपला शेवटचा चित्रपट ‘नसीम’ बनवला. ‘नसीम’ हा चित्रपट बाबरी मशीद पाडल्या नंतरच्या सामाजिक वातावरण व राजनीतिक परिवर्तनावर होती. […]

सर्वांग परिपूर्ण सुखाची परिभाषा मेघदूतम् !

रसग्रहण हा तर मेघाच्या दृष्टीने एक वेगळाच विषय. मार्गात येणारी प्रत्येक नदी त्याची प्रेयसी आहे. त्याच्या विरहात ती रोडावली आहे. त्या प्रत्येकीचे पाणी (णि) ग्रहण करीत रसग्राही मेघ पुढे सरकत राहतो. पाथेय म्हणून कमलतंतु धारण करणारे राजहंस, कर्दळीच्या कळ्या खाणारे हरीण शावक, मकरंद ग्रहणाने धुंद झालेले भ्रमर या सगळ्या रसांच्या सोबत भगवान महाकालाच्या मंदिरात आणि हिमालयावर प्रत्यक्ष भगवान शंकरांच्या सानिध्यात ओसंडून वाहणारा भक्तिरस हा एक वेगळाच आनंदोत्सव आहे. […]

निपटारा – भाग  1

सकाळच्या ‘दै. मराठवाडा’ तील हेडलाईन वाचली आणि मी सुन्नच झाले. ‘अरुंधती पांडे या कॉलेज युवतीची आत्महत्या!” क्षणभर डोकं बधीर झालं. डोळ्यांवर विश्वासच बसेना. पुन्हा पुन्हा वाचलं अन् धावतच गेले घरात. “मामी, मामी! वाचलीस का ही बातमी? अग आपली अरू गेली.’ “काय?’ मामी किंचाळलीच. “बघू बघू’ म्हणून पेपर हातात घेतला आणि डोळे विस्फारून ती हेडलाईनकडे पाहतच बसली. […]

चित्रकूट एक्सप्रेस: एक प्रयोग

मध्यप्रदेशातील चित्रकूट ही श्रीरामांची कर्मभूमी आणि नानाजी देशमुखांनी राबविलेल्या विविध प्रकल्पांची जागा आहे. ‘विवेक व्यासपीठा’तर्फे ‘चित्रकूट प्रकल्प यात्रे’चं आयोजन करण्यात आलं होतं. कुर्ला टर्मिनस ते चित्रकूट ही यात्रा-स्पेशल गाडी दिमाखात प्लॅटफॉर्मवर उभी होती. १७ डब्यांच्या गाडीच्या प्रत्येक डब्याला नद्यांची नावं देण्यात आली होती. मंदाकिनी, दमणगंगा, कावेरी, गंगा, यमुना, ही नावं झळकत होती व प्रत्येक डब्यावर ऋषितुल्य […]

ए आयेऽ

कणखर आवाज, बोलके डोळे, ग्रामीण भाषा, साधी वेशभूषा ही त्यांची वैशिष्ट्ये होती. आई मुलांचे नातेसंबंध साकारताना, त्यांनी दादांना कधी गावरान शिव्या देखील दिल्या तर कधी त्या हळव्या झाल्या. पूर्वीच्या चित्रपटातील, आईची प्रतिमा बदलून टाकणाऱ्या रत्नमाला, खाजगी जीवनातही स्वतःच्या मुलाविषयी संवेदनशील होत्या. […]

कविकुलगुरु कालिदास

कालिदास प्राचीन नाही, मध्ययुगीन नाही. तो ‘होऊन गेलेला’ नाही, तो ‘आहे तसाच’ आहे. तो काल होता, आज आहे आणि उद्याही राहील. तो एका प्राचीन भाषेच्या नागमंडलात खिळलेला नाही, तो कालनिरपेक्ष आहे. ‘मेघदूत’ निर्माण करणार्‍या कालिदासाची पदवी तरी कशी ठरवावी ? तो निसर्गाकडून पाठ घेणारा आणि पाठ देणारा नाही. तो केवळ प्रेमिकही नाही. मग त्याचे सृष्टीशी नाते तरी काय ? सर्व नात्यांपलीकडचे त्याचे नाते अवघ्या आसमंताशी आहे. तो आणि निसर्ग असे द्वैत मुळातच मावळलेले आहे. उरले आहे फक्त तादात्म्य.” […]

शेवटचं पान (संक्षिप्त रूपांतरीत कथा २९)

शिमला आणि मनाली ह्यामधे कुलू येतं. पर्वतराजी आणि आजूबाजूच्या प्रदेशाची चित्रें रेखाटू इच्छिणारे अनेक चित्रकार तिथे कांही काळ स्थायिक होतात. हॉटेलात दीर्घ काळ रहाणं त्यांच्या किंमतीमुळे केवळ अशक्य असतं. तशातच ह्यांतल्या अनेक चित्रकारांच अजून नाव झालेलं नसतं. त्यांच्या चित्रांना हवा तसा मोबदलाही मिळत नाही. तेव्हां तिथे भाड्याने घर घेऊन रहाणं हा एकच मार्ग चित्रकारांसमोर असतो. एका […]

1 136 137 138 139 140 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..