नवीन लेखन...

आदर्श राजमाता जिजाऊ

कोणाच्या जीवनावर आईचा तर कोणाच्या जीवनावर वडिलांचा प्रभाव तुलनेने अधिक प्रमाणावर अढळतो . शिवछत्रपतीनां त्यांच्या आईने काय दिले हे आख्खा महाराष्ट्र जाणतो . जिजाऊ या जगात नसत्या तर या मराठ्यांच्या इतिहासाला अंकुर फुटला नसता, असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही . अशा या राजमातेचा आदर्श सारया भारतीय संस्कृतीतील स्त्रियांना घेण्यासारखा आहे . […]

सिसिली लेफोर्ट – दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

16 जून 1943 ला सिसिलिने लॉर व्हेलित प्रवेश केला.तिने कुरियर म्हणून शस्त्रे स्फोटके पोचवण्याचे काम केले. ज्यामुळे फ्रांस गुप्तहेरानी रुळ उखडणे,पॉवर स्टेशन, कारखाने,उधवस्थ केले. ज्यामुळे जर्मन सैनिक सावध झाले.त्यामुळे एसओई गुप्तहेर संघटनेच्या हेराना सावध रहाण्याचे आदेश दिले गेले. […]

प्रसन्न

‘तंबाखू’ नावाच्या बाई नव्याने शाळेत आल्या नि शिस्तचा बडगा… नव्हे दांडकाच वर्गात अवतरला. सोनिया चूप बैठनेवालोंमेसे नही थी. तंबाखू बाई एक शब्द उच्चारला तरी शिकवणे बंद करी. चूप बसत. हे म्हणजे टू मच, थ्री मच, मचमच होतं. ना? तंबाखू बाईंनी न शिकविता पाठ पूर्ण झाल्याचे वर्गात सांगताच वर्गात टाचणी शांतता पसरली. […]

‘डिजिटलायझेशनशिवाय पर्याय नाही…

बदलते अर्थकारण, आधुनिक बँकिंग आणि सहकार चळवळ याचे अभ्यासक अशी ओळख असलेले टीजेएसबी सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शरद गांगल यांच्याशी साधलेला सुसंवाद त्यांच्या दूरदृष्टी आणि सखोल अभ्यासाची प्रचिती देतो. नुकतीच त्यांनी टीजेएसबी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली आहे. तत्पूर्वी टीजेएसबी बँकेचे उपाध्यक्ष म्हणून ते काम पहात होते. […]

तृप्त जीवन

प्रत्येकाचेच जग वेगळे सुखदुःखही वेगवेगळे संवेदनांची जाणीव एक तिथे नसते काही वेगळे सृष्टीही सारी एकसारखी काही नसते कुठे वेगळे ऋतुंचे आविष्कार सारखे सुखावणारे क्षण आगळे नित्य पांघरित चैतन्याला भोगावे जगण्याचे सोहळे जन्म मरण हे एकची सत्य याहुनी जीवन नाही वेगळे जीवाजीवा सुखवित जावे कृतार्थ जीवन हेच आगळे — वि.ग.सातपुते (भावकवी) (9766544908)  रचना क्र. ३०५ २५/११ २०२२

चिनी कलेची विविधता – भाग १

तिबेट या जगाच्या छपरावर ७-८ दिवस घालवून आमची तिबेटचा निरोप घेण्याची वेळ झाली तेव्हा लक्षात आले की प्रत्येक ट्रीप मध्ये निदान एकतरी स्थानिक कला परदेशवासीयांना दाखवली जाते. कधी नाच असतो कधी आपल्याकडच्या डोंबाऱ्यांच्या कसरतींसारख्या कसरतींचे खेळ असतात, प्राचीन काळच्या राहणीमानाची कल्पना देण्यासाठी एका छोट्याश्या खेड्यात भेट देण्याचा कार्यक्रम असतो. पण असले तिबेटच्या मुक्कामात काहीच नव्हते.तेंव्हा ही […]

बर्फाखालची नदी

अंटार्क्टिका खंडावरच्या जमिनीचा मोठा भाग बर्फानं व्यापला आहे. या बर्फाच्या थराखाली पाण्याचे अनेक ‘तलाव’ अस्तित्वात असल्याचं, यापूर्वीच्या संशोधनातून दिसून आलं आहे. हे तलाव बर्फाच्या तळाशी, पृष्ठभागापासून दोन ते चार किलोमीटर खोलीवर वसले आहेत. यातले काही तलाव एकमेकांना जोडले आहेत. […]

उगाच काहीतरी -२४

काल मी मरता मरता वाचलो. त्याचं काय झालं की सध्या आमचे कन्यारत्न हॉस्टेल वरून घरी आले आहे आणि नेहमी प्रमाणे आम्हाला बोटावर नाचवणे चालले आहे. तशी तिला हॉस्टेलवर राहून ही आम्हाला फोनवरून नाचवण्याची कला अवगत आहे. पण असो तर पॉंइटाचा मुद्दा हा की तिने दोन दिवसापुर्वी हुकूम सोडला की तिला ती कुठलीशी H&E पेन्सिल पाहिजे आहे. […]

मन:शांती

आता काय बोलायाचे आता काय ऐकायाचे घडणारे ते घडूनी जाते सारे समजून घ्यावयाचे तडजोडित, मन:शांती शल्य कुणास सांगायाचे स्वप्नी आठवांचे मोहोळ सांगा ? कसे थोपवायचे ऋणानुबंध गतजन्मांचे सारे सावरित जगायाचे मैत्र! निर्मोही सावरणारे तेच सदा अंतरी जपायचे मुक्तिचाच ध्यास जीवाला हरिनामात सुखी रमायचे — वि.ग.सातपुते (भावकवी) (9766544908)  रचना क्र. ३०४ २५/११/२०२२

भारतीय रेल्वेची स्वयंपूर्णतेकडे घोडदौड

स्वातंत्र्यपूर्व काळात रेल्वेयंत्रणा जवळजवळ संपूर्णपणे ब्रिटिशांकडून आयात होणाऱ्या गोष्टींवर अवलंबून होती. चित्तरंजन लोको वर्क्स हा कारखाना हे स्वातंत्र्यानंतरचं प्रगतीचं पहिलं पाऊल होतं. प्रथम धुराची इंजिनं बनवणाऱ्या या कारखान्यात आता वर्षाला १५० ते १७० इलेक्ट्रिक इंजिनं बनविली जातात. आता फक्त २५ टक्क्यांहून कमी सामग्री परदेशी बनावटीची वापरली जाते. डिझेल इंजिनं बनविण्याचा कारखाना वाराणसी येथे अमेरिकेच्या मदतीने सुरू […]

1 12 13 14 15 16 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..