भारतमातेच्या वीरांगना – 7 : सुशीला दीदी
भारतीय स्वातंत्र्य संग्रामात काकोरी रेल लूट ही एक मोठी घटना होती. त्या क्रांतिकारकांना जेव्हा फाशी सुनावण्यात आली तेव्हा सुशीला दिदींना त्यांच्या देशप्रेमाने आणि कर्तव्याने स्वस्थ बसू दिले नाही. आता त्यांनी पूर्णवेळ स्वातंत्र्य चळवळीत जीव ओतून काम करायाचे ठरविले. एका स्त्रीला सगळ्यात जवळची गोष्ट म्हणजे तिचे दागिने, ह्या घटनेच्या वकिली कामासाठी त्यांनी आपल्या सोन्याच्या बांगड्या सहज देऊन टाकल्या. आपल्या मुलीचे इंग्रजांविरुद्ध बंड आपल्या नौकरीसाठी धोकादायक ठरू शकणार होते, पण आपल्या वडिलांच्या ह्या विरोधाला न जुमानता त्या घरा बाहेर पडल्या आणि दोन वर्षे आपल्या घरी परतल्या नाही. दोनवर्षांनंतर तेव्हाच परतल्या जेव्हा त्यांच्या वडिलांनीसुद्धा आपल्या सरकारी नौकरीला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ स्वातंत्रता चळवळीचे काम सुरू केले. […]