इथून तिथून, मिथुन
फटीआयआय मध्ये अभिनयाचं शिक्षण घेऊन, १९७६ साली ‘मृगया’ चित्रपटातून त्यानं रुपेरी कारकिर्दीला सुरुवात केली. सडपातळ, सावळ्या रंगाचा व घोगरा आवाज असलेला मिथुन पहिल्या चित्रपटालाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला व त्याची घोडदौड सुरू झाली. ‘सुरक्षा’ व ‘तराना’ मध्ये तो रंजितासोबत, बेलबाॅटममध्ये दिसला. या दोन्ही चित्रपटांमधील, सर्वच गाणी उत्तम होती. इथूनच त्याची ‘टिपिकल’ नाचण्याची स्टाईल, लोकप्रिय झाली. […]