नवीन लेखन...

ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे

गरिबांसाठी त्यांनी स्वस्त किमतीमध्ये घरे बांधून शासनासमोर आणि संपूर्ण देशासमोर नवा आदर्श निर्माण केला. ‘सिमेंट घोटाळा’ ‘एन्रॉन प्रकल्प’ या विरोधात त्यांनी आवाज उठवला. शासनातील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे त्यांनी बाहेर काढली. […]

धुरंधर राजकारणी स. का. पाटील

फिरोजशा मेहता यांच्यानंतर राष्ट्रीय स्थान प्राप्त करणारे दुसरे नेते म्हणजे स. का. पाटील. भारतीय महापौरपदाला जागतिक पातळीवर प्रतिष्ठा मिळवून देणारे ते एकमेव महापौर अशी इतिहासात नोंद आहे. […]

उद्योगपती गौतम अदानी

ते जसे नेहमी सांगतात की, यशाची गुरुकिल्ली दडली आहे सातत्यपूर्णतेने काहीतरी शिकत राहण्यात. त्यांचा हा मंत्र घेऊनच त्यांची वाटचाल सुरू आहे आणखी लक्षावधी डॉलर्सच्या उद्योगांना गवसणी घालण्यासाठी! […]

हिमशिखरांच्या सहवासात – मनोगत

हिमालयाच्या निसर्गाला पावित्र्याची, आध्यात्माची, संस्कृतीची जोड आहे. हिमालयातील पर्वतशिखरे, नद्या, सरोवरे, मंदिरे, निरनिराळी स्थाने यांच्याशी जोडलेल्या कथा, मिथकं ऐकताना मन मंत्रमुग्ध होते. प्रत्येक भागातील चालीरिती, रिवाज, सण, उत्सव, श्रद्धास्थाने, देव-देवतासुद्धा वेगळ्या आणि त्यांना जोडले आहेत पुराणकथांचे, निरनिराळ्या घटनांचे संदर्भ! हे सर्व अनुभवायचे असेल तर अनवट वाटांवर केलेल्या पदभ्रमंतीसारखा दुसरा पर्याय नाही. […]

मानवी रक्तगट शोधणारा कार्ल लँडस्टायनर

त्यांनी संशोधन करेपर्यंत सर्व मानवजातीच्या शरीरात एकाच प्रकारचे रक्त असते असा समज प्रचलित होता; परंतु त्या काळी युरोपातील रुग्णालयात जखमी सैनिक आणि इतर रुग्णांना रक्ताची आवश्यकता असल्यास सरसकट कोणाही रक्तदात्याचे रक्त दिले जाई. रुग्णाच्या शरीरात हे दुसऱ्याचे रक्त गेल्यावर बहुतेक वेळा रक्तात गुठळ्या तयार होत आणि रुग्ण किंवा सनिक दगावण्याच्या घटना होत असत. अशा अनेक घटना घडल्यावर व्यक्तीव्यक्तींच्या रक्तात काही तरी फरक असला पाहिजे अशी लँडस्टायनरना शंका येत होती. रक्तविषयक संशोधनाचा त्यांनी ध्यास घेतला. […]

चंद्राच्या मातीतून उगवलं रोपटं! भविष्यात चंद्रावर शेती शक्य?

काही वर्षांपूर्वी ज्या चंद्राकडे लहान मुले आपला मामा म्हणून पाहत होती , त्याच चंद्रावर नंतर मानवाची पावले उमटली . नंतरची पिढी चंद्रावर वसाहत तयार करण्याचा विचार करू लागली . चंद्रावर पाणी आणि अन्य जीवनोपयोगी गोष्टींचा शोध घेऊ लागली . आता नवी पिढी चंद्रावर चक्क शेती करू पाहत आहे . होय ! विश्वास बसणार नाही ; पण हे खरे आहे. […]

स्वदेशी आत्मनिर्भरता

लॉकडाऊनच्या काळातील एका भाषणात आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत लोकल म्हणजेच ‘स्वदेशी’ व आत्मनिर्भरता म्हणजे ‘स्वावलंबन’ याविषयी मार्गदर्शन केले ते अत्यंत योग्य होते. भारतीय समाजव्यवस्था व अर्थव्यवस्था सुस्थितीत आणण्यासाठी उचललेले ते योग्य पाऊल आहे असे मी समजतो. […]

भारतमातेच्या वीरांगना – 6 : मूलमती

रामप्रसाद ह्यांचे पहिले पिस्तुल घ्यायला पैसा मूलमतींना पुरवला. ते हाती देतांना मात्र एक वचन घ्यायचे त्या विसरल्या नाहीत, की अगदी कुठल्याही प्रसंगी, आपल्या शत्रूवर सुद्धा ह्या शस्त्राचा गैरवापर करणार नाही. […]

नाटककार स. पां. जोशी

1950 साली सानेगुरुजींच्या निधनानंतर, सानेगुरुजी स्मारकाच्या हालचाली सुरू झाल्या. त्यावेळी सपांमधील नाटककार जागा झाला. गुरुजींच्या ‘आंतरभारती’ संकल्पनेवर आधारित ‘जीवनकला’ या सपांनी लिहिलेल्या नाटकाचा प्रथम प्रयोग डोंबिवलीच्या स. पां. जोशी विद्यालयाच्या प्रांगणात 9 जानेवारी 1951 रोजी झाला. याच नाटकाचा दुसरा प्रयोग 11 फेब्रुवारी 1951 रोजी झाला. त्यावेळी ‘नवशक्तिकार’ प्रभाकर पाध्ये यांच्या हस्ते नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या नाटकास आचार्य अत्र्यांची प्रस्तावना लाभली होती. शं. दि. डोंगरे कृत हिंदी अनुवादाचे प्रकाशन ऑक्टोबर 1951 मध्ये झाले. […]

रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज

रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी झाला. महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते १७ मार्च १८८४ रोजी कोल्हापूरच्या […]

1 141 142 143 144 145 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..