स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन
दुसऱ्या महायुद्धानंतर निवडून आलेल्या क्लेमंट ऍटर्लीच्या मजूर पक्षाच्या शासनाने भारताला स्वातंत्र्य देण्याचे ठरविले. हे मोठे जटील काम होते तसेच मुस्लिमांच्या मागणीप्रमाणे वेगळे राष्ट्रही निर्माण करायचे होते. ही कामगिरी लॉर्ड माउंटबॅटन यांच्यावर सोपविण्यात आली. मार्च १९४७ मध्ये ते शेवटचे व्हाइसराय म्हणून भारतात आले. त्यांनी ३ जून १९४७ रोजी भारतास १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली. […]