नवीन लेखन...

झुरळाने काटा काढला! – भाग 2

दोन वर्षांनी मला मशीदबंदरला एका सहकारी बँकेत नोकरी लागली. पहिल्याच दिवशी उशीर नको म्हणून मी अर्धापाऊण तास आधीच गेलो तेव्हा वॉचमन बँकेचं दार उघडत होता. मला पाहून तो म्हणाला, “साहेब! बँक उघडायला अजून वेळ आहे, काय नवीन खातंबितं खोलायचंय का?” “नाही मी इथं नोकरीसाठी आलोय. आजपासून हजर व्हायचं आहे.” “असं का मग बसा आत, थोड्या वेळाने […]

फ्रंटियर मेल (गोल्डन टेंपल मेल)

मुंबईहून दिल्लीमार्गे थेट पाकिस्तानच्या सरहद्दीपर्यंत जाणारी पश्चिम रेल्वेवरील ही एक अति-महत्त्वाची गाडी. दोन रात्रींचा प्रवास करत ही गाडी मुंबईहून अमृतसर शहर गाठते. सरहद्दीपर्यंत जाणारी गाडी म्हणून पूर्वी तिचं नाव ‘फ्रंटियर मेल’ असं होतं. पुढे अमृतसर तेथील सुवर्णमंदिरामुळे प्रसिद्धीस आल्यानंतर या गाडीला ‘सुवर्णमंदिर एक्सप्रेस’ असं नाव ठेवलं गेलं. आज ही गाडी त्या दोन्ही नावांनी ओळखली जाते. ब्रिटिश […]

भारतमातेच्या वीरांगना – 3 : यशोदा गणेश सावरकर

आपल्या समाज रचनेत विवाहित स्त्री काचेच्या बांगडी शिवाय राहणे समाज रचनेला मान्य नव्हते, पण जेव्हा त्यांना कळलं की बांगडीची काच विदेशी आहे, त्यांनी त्याचा त्याग केला. दोन वेळ खाण्याची भ्रांत, इंग्रजी हुकमशाहीचा ससेमिरा, नवरा दूर, मुली अल्पायुषी, दोन धाकट्या दिरांची आणि त्यांच्या बायकांची जवाबदारी आणि देशसेवा ही सगळी व्रत एकाच वेळी त्या माउलीने पेलली. […]

आत्मनिर्भर भारत : व्याप्ती आणि दूरदृष्टी

आत्मनिर्भर म्हणजे जगापासून अलिप्त नाही, ‘आयात नाही’ असे नाही, ‘जगाशी व्यापार संबंध तोडणे’ असा नाही. तर आपल्या अर्थव्यवस्थेला आवश्यक असे धोरण ठरविणे होय. आपले SWOT (Strengths, Weaknesses, Opportunities and Threats) ध्यानी घेऊन, यांचा अभ्यास करून आमच्या विकासाच्या संकल्पनेशी सुसंगत आणि आमच्या संसाधनांचा विचार करून ठरविलेले धोरण म्हणजे ‘आत्मनिर्भर भारत’ होय. […]

चंद्रावरचं बर्फ

चार अब्ज वर्षांपूर्वी, चंद्राच्या कवचावर लावा सांडला आणि आज आपण पाहत असलेल्या चंद्रावर माणूस कोरतो. पण ज्वालामुखींनीही खूप थंड वारसा सोडला असेल आणि तो बर्फाच्या स्वरूपात असावा असा संशोधकांचा दावा आहे. […]

वाट पाहुनी जीव शिनला

माणूस कुणाची ना कुणाची वाट पहातच आपलं आयुष्य घालवतो. वयानुसार त्याचे वाट पहाण्याचे संदर्भ, हे बदलत जातात. मात्र ‘वाट पहायचं’ काही संपत नाही. अगदी स्वतःपासून सुरुवात करुयात. आपला जेव्हा जन्म होणार असतो, तेव्हा आपल्या वडिलांची घालमेल होत असते. ते वाट पहात असतात. कधी बाळाचा ‘आवाज’ येतोय? एकदाचा आवाज येतो आणि त्यांचा जीव भांड्यात पडतो. वाट पाहिल्याचं, […]

दोन गुलाबी गुलाब

मी विचार करत होते की आईची शिकवण व संस्कार याची जाण ठेवणारी मुलगी व गुलाबाचे फूल देऊन न फसवणारा. आणि विश्वास घात न करणारा मुलगा ज्या घरात केवळ आईच्या संस्कारामुळे असे निभावेल असा मुलगा घरोघरी असेल तोच दिवस खऱ्या अर्थाने रोझ डे म्हणजे गुलाब दिन असेल. आणि मला आता जाणवल आहे की देवाला फूल वाहून जे पुण्य मिळाले असते तेवढेच आता हे सगळं पाहून मिळाले आहे. […]

वेगळा (कथा) भाग १

अंगाच मुटकुळ करून बारा-तेरा वर्षाचा मुलगा एका पडलेल्या घराच्या ओसरीतअगदी डोक्या पर्यंत पांघरून घेऊन झोपला होता , सकाळचे पाच – साडेपाच वाजले होते , वस्तीला बऱ्याच प्रमाणात जाग आली होती, […]

शंख-शिंपले

जिथे नदी किनारी शंख-शिंपले शोधले वाळूत खेळताना किती किल्ले बांधले // धृ // त्या दिवसांची आठवण येता, तुला ना विसरावे स्पर्श होता तुझ्या बोटांचा, पुन्हा सर्व आठवावे परंतु हा भास आता, स्वप्न वाटे चांगले //१// ते थोडेसे दिवस सुखांचे, भुर्रकन उडुन गेले जीवनात सात रंगांचे – इंद्रधनुष्य बनवुन गेले दिवस – रात्र, पुनर्भेटीचे वेध लागून राहीले […]

रेशन कार्ड (लघुकथा)

प्रमोशन मिळाल, ग्रेड वाढली तसं तो ‘वन आर.के.’ मधून ‘वन बी.एच.के’ क्वार्टर साठी एलिजिबल झाला. तसा अर्ज केल्यावर थोड्याच दिवसांत त्याला वन बी.एच.के. क्वार्टर मिळाला, आणि आठवडाभरात तो नवीन क्वार्टरमधे रहायला गेला. […]

1 147 148 149 150 151 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..