दान आणि मान
वटसावित्री पौर्णिमा.. आम्हा बायकांचा अतिशय जिव्हाळ्याचा दिवस असतो वडाच्या पुजेची तयारी पारंपरिक पोषाख आणि श्रद्धेने भक्तीने अखंड सौ भाग्याचे लेण मिळावे म्हणून वडाला दान मागायचे असते गावी असतांना वडाच्या पुजेला जात होते पण नंतर मात्र घरीच वटवृक्षाच्या पुजेचे चित्र मिळायचे ते आणून एका खपटावर डकवून पुजा करते आहे आजही फक्त दोरा घेऊन फेरी मारता येत नाही म्हणून त्याचे सातपदरी फोटोतल्या वडाला चिटकवते पूर्वी सात प्रदक्षिणा घालायची आता नाही. […]