नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य
एकीकडे अगदी नाचणं जीवावर येत असलेल्या सन्नी देओल, आणि अजय देवगणसारखे हिरो गणेशकडून धडे घेणं पसंत करतात; तर दुसरीकडे हृतिक रोशन सारखे नृत्यनैपुण्य असलेले लोकही त्याला पसंती देतात. माधुरीपासून ते कतरीना पर्यंत सगळ्यांसाठी तो नृत्य बसवतो. आपल्या सव्वाशे किलोच्या शरिराचा कसलाच अडथळा न होऊ देता नृत्य, अगदी एकेक स्टेप करून दाखवतो आणि आपल्या मुंबईय्या भाषेत समजावूनही सांगतो! […]