नवीन लेखन...

हयातीचा दाखला

पाच हजारांची फ्रेण्डलिस्ट असणाराही, फेसबुकवर एकटा पडू शकतो.. तो फेसबुकवर कसा व्यक्त होतो, हे महत्त्वाचे असते.. काहीजण सतत टिका करीत असतात.. काहीजण एखाद्या पक्षाचे समन्वयक म्हणून कार्यरत असतात.. काही उपदेशाचे ‘रेडिमेड’ डोस पाजत असतात.. इथं जर तुम्ही जसे आहात तसेच राहिलात, तर अधिक लोकमान्यता मिळते.. […]

उत्कट

मुंबईतील गर्दी हा “मुंबई शहर” याविषयामधील एक अटळ मुद्दा आहे. दक्षिण मुंबईतील व्यापारी भागात तर दिवसा चालता येणं मुश्किल होते इतकी गर्दी असते. अशा भागात दिवसा वाहनांचे किरकोळ अपघात सतत घडत असतात. मजेची बाब अशी की रविवारी त्याच रस्त्यावर “तरुण मुले क्रिकेट खेळून दंगा करत आहेत” अशा तक्रारीही पोलिसांकडे येतात. गर्दी आली की त्या अनुषंगाने येणाऱ्या गुन्ह्यांचे आणि घटनांचे प्रकारही आलेच. पाकिटमारी, बॅग खेचून पळुन जाणे, कपडयावर घाण टाकून धुण्यासाठी मदत करावयाच्या बहाण्याने बाजूला नेणे आणि बॅग खाली ठेवून आपल्या शर्टावरची घाण धुण्यात दंग असलेल्या मालकाला घाणी बरोबरच आपली बॅगही नाहीशी झाल्याचा दृष्टांत होणे हे नित्याचेच. […]

थडग्यातले गंध

वासांशी संबंधित नव्या संशोधनात इजिप्तमधील उत्खननाचा मोठा वाटा आहे. इजिप्तमधील उत्खननात प्राचीन काळातली अनेक थडगी सापडली आहेत. या थडग्यांत त्या काळच्या प्रथेनुसार अनेक पदार्थ ठेवलेले असतात. यांत विविध सुगंधी द्रव्यांपासून ते खाद्यान्नापर्यंतच्या पदार्थांचा समावेश असतो. हे पदार्थ ठेवलेली काही भांडी उघडी असतात, तर काही भांडी बंद केलेली असतात. बंद भांड्यांतील पदार्थांचा शोध घेताना, या इतिहासकालीन भांड्यांची मोडतोड होऊ द्यायची नसते. त्यामुळे भांड्यात कोणते पदार्थ ठेवले आहेत, ते शोधणं आव्हानात्मक असतं. अशा बंद भांड्यांतील पदार्थ ओळखण्याचा एक लक्षवेधी प्रयत्न, इटलीतील पिसा विद्यापीठातल्या इलारिआ देगानो आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी अलीकडेच केला आहे. इलारिआ देगानो आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन, इजिप्तमधल्या एका प्राचीन थडग्यात सापडलेल्या वस्तूंवरचं आहे. हे संशोधन म्हणजे याच थडग्यावरच्या, ‘टीटी८’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या एका मोठ्या संशोधन प्रकल्पाचा भाग आहे. […]

वादळ गतस्मृतींचे

आठविते ते सारे आता स्मृतींचीही कमाल आहे गात्रे जरी झाली मलुल मन, मात्र उत्साही आहे अनुभवलेले जीवन सारे जपुन पाऊले टाकित आहे काय मिळाले अन हरविले आता विसरून गेलो आहे घडायाचे ते ते घडूनी गेले अजूनी काय घडणार आहे अंतरात वादळ गतस्मृतींचे आज मात्र घोंगावते आहे ललाटीच्या त्या रेषा साऱ्या संचिताचे भगवंती दान आहे आता व्हावे […]

बाई आली पणात

सुगीचे दिवस आले होते अन् समधी माणसं कशी पटापटा आपल्या कामाला लागली व्हती. शाळूकाढायला आला व्हता. कारडी गहू, हरभऱ्यानी रानं कशी फुलून तरारली व्हती. चिंचोळलीमधी जिकडं तिकडं घाई गडबड चालू व्हती. समधं शेतकरी लई कामात व्हढाचढीनं मरमर मरोस्तवर काम उरकीत व्हती. गावात शिंद्याची आळी विठ्ठल रखमाई दोन्ही हात देवळात कमरेवर ठेवून जणू चिंचोलीची राबणारी कष्टकरी बाई बाप्पे पाहत होती. […]

हवा हवाई

दिसत नाही, मात्र जाणवते.. ती ‘हवा’! मंद हवेची लहर आली, तर तिला ‘झुळूक’ म्हटलं जातं.. तिचं जर वेगाने आली तर तो होतो, सोसाट्याचा वारा.. अशा वाऱ्यानं वेगाची परिसिमा ओलांडली की त्याचं रूपांतर वादळात होतं.. […]

ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार

कोल्हापूर येथून शिक्षण घेतल्यानंतर कुलदीप पवार मुंबईत दाखल झाले. तिथे प्रभाकर पणशीकर यांनी ‘इथे ओशाळला मृत्यू‘ ह्या नाटकात संभाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी दिली. त्यांची ही भूमिका खूप गाजली देखील. […]

राष्ट्रवादी काँग्रेस चा २३ वा वर्धापन दिन

१९९९ आणि २०१४ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढले तेव्हा काँग्रेसचे जास्त आमदार निवडून आले. २००४ आणि २००९ मध्ये आघाडीत काँग्रेसचे संख्याबळ जास्त होते. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला मागे टाकले. राष्ट्रवादीचे ५४ तर काँग्रेसचे ४४ आमदार निवडून आले. काँग्रेसची जागा घेण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत साकार झाले. […]

स्मृतींच्या हिंदोळी

स्मृतींलहरींच्या हिंदोळ्यावर मन धावते, हरीच्या गोकुळी।।धृ।। रवीरथी नारायण हरिमुरारी घुमवी मंजुळ मधुरम पावरी जागते गोकुळी राधा बावरी छुमछुम छंदी, नाद गोकुळी।।१।। चराचरातुनी सुरेल नादब्रह्म हरेरामकृष्ण, गोविंद गोविंद जीवा तोषवीतो हरि कृपाळु देवकीनंदन, ब्रह्म ते गोकुळी।।२।। प्राजक्त,उभा रुक्मिणी द्वारी सडा फुलांचा सत्यभामे द्वारी निर्मळी प्रीती, निर्मळी भक्ती हरिहराचा भुलभुलैया गोकुळी।।३।। — वि. ग. सातपुते. (भावकवी) 9766544908 रचना […]

1 169 170 171 172 173 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..