घडलय बिघडलंय
कपड्या बद्दल तर एवढी मोठी क्रांती झाली आहे की एक स्वतंत्र ग्रंथ होईल. वारेमाप कपडे. पण धुण्याचा अजिबात त्रास नाही. वॉशिंगमशिन तयार आहेच. डाग काढायला सोयीचे झाले आहे. त्यामुळे दाग अच्छे है असे म्हणत आई हसतमुखाने लेकराचे कपडे धुते. शिवाय हे लेस ते लेस सगळेच यूजलेस असलेले तोकडे कपडे पाहून वाटते की मूलभूत गरज आहे की मूलभूत सुविधा आहे. आणि एक फायदा म्हणजे जीन्स. टिशर्टस कुणीही कुणाचे घालू शकतात. म्हणजे हे मला नक्की माहीत नाही पण ऐकले आहे म्हणून लिहिण्याचे धाडस केले आहे. […]