आनंदाचा पारिजातक
छोट्या छोट्या अशा क्षणांतील मजा चाखता जगता यावे पार नसलेल्या आनंदालाही मग इवल्याशा मुठीत मावता यावे थकून सायंकाळी घरी आल्यावर प्रसन्न वदनी दीप उजळावे दाराआड लपलेल्या गंमतीने चिमुकल्या पावलांचे रुप घ्यावे हेतूक-अहेतूक नाजूक कटाक्षांनी मोहरत्या कळ्यांचे गंध व्हावे जीवन उरवणाऱ्या क्षणांना धडकत्या स्पंदनांनी साक्ष रहावे दाटून येणाऱ्या स्निग्धतेतून पोक्तशा मायेचे स्पर्श जाणवावे जीवनाशी नाळ अजून अबाधित […]