सागरमाथा
एका सामान्य ओझी वहाणाऱ्या हमालाच्या नशिबात, एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं भाग्य लिहिणाऱ्या चित्रगुप्ताचं, खरंच कौतुक वाटतं.. आज या गोष्टीला एकोणसत्तर वर्षे झालेली असली तरी शेर्पा तेनझिंगला विसरणं कदापि शक्य नाही… त्यांचा तो हसरा चेहरा प्रत्येक भारतीयाच्या मनावर कोरलेला आहे.. तो पाचवीत पाहिलेला रंगीत फोटो अजूनही स्मरणात आहे… आजपर्यंत शेकडो गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर केलेला असला तरी, तेनझिंगची सर त्यांना नाही… […]