‘मल्टी लेव्हल मार्केटिंग’ म्हणजेच ‘मला लोंबकळलेली माणसं’.. अशा स्किममध्ये आपल्याला अडकवणारे, नंबर एकचे ‘फेकाडे’ असतात.. माझा इयत्ता पहिलीतला मित्र, माझ्या पन्नाशीत मला भेटला. त्यानं जनरल चौकशीनंतर, विषयाला हात घातला. तो म्हणाला, ‘आतापर्यंत खरं तर तू, तुझ्या कारमधून फिरायला हवा होतास.. अजूनही वेळ गेलेली नाही.. तू माझ्या स्किममध्ये सहभागी हो.. काही महिन्यांतच कारमधून फिरशील..’ मला ओशाळल्यासारखे झाले.. एवढं कळकळीनं सांगतोय, तर प्रयत्न करुन बघू.. म्हणून मी सहभागी झालो.. आठवड्यातून तीन वेळा सेमिनारला जाऊ लागलो. कळसूत्री बाहुलीप्रमाणे, लेक्चर देणाऱ्याच्या इशाऱ्यावर टाळ्या वाजवू लागलो.. दरवेळी एखाद्या नवीन मित्राला, ‘बकरा’ करुन घेऊन जाऊ लागलो.. महिन्याभरातच, माझ्याखाली कुणालाही जोडू न शकल्याने स्किममधील पैसे वाया गेले आणि मी नैराश्यात गेलो.. […]