संध्याकाळी एका हॉलमधे जमून, आमच्यातील वयाने सर्वात ज्येष्ठ आणि सर्वात लहान अशांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात झाली. सर्वप्रथम दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर आमच्या बॅचमधील एकूण तिघांपैकी, जे PSI झाल्यावरही पुढे स्पर्धा परीक्षा देऊन, आय पी एस होऊन Additional Director General of Police या अतिउच्च पदावरून निवृत्त झाले, त्यापैकी उपस्थित दोन, त्याचप्रमाणे बॅचमधील पदक विजेते अधिकारी, यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. त्यानंतर हॉटेलच्या lawn वर टेबल्स लाऊन snacks, Karaoke, गप्पा, थट्टामस्करी, रात्रीचे जेवण इ. ११.३० पर्यंत चालले. […]