ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते विजय कदम
विजय कदम यांचे ‘अपराध कुणाचा’ हे पहिलं व्यावसायिक कुमार नाटक होते.पुढे ‘स्वप्न गाणे संपले’ या नाटकात सतीश दुभाषी, जयराम हर्डीकर, शिवाजी साटम अशा प्रतिथयश कलावंतांसोबत काम करावयास मिळालं. ‘खंडोबाचं लगीन’ या जागरण विधी नाटकाने विजय कदम यांना नाट्य दर्पणचा ‘सर्वोत्कृष्ट लोकनाटय अभिनेता’ हा पुरस्कार मिळवून दिला. रथचक्र, घरटे आमुचे छान, वासुदेव सांगती, अशी व्यावसायिक नाटके करता करता टूरटूर या नाटकाने मात्र जबरदस्त लोकमान्यता मिळाली. तर विच्छा माझी पुरी करा या लोकनाटयाने राजमान्यता दिली. […]