नवीन लेखन...

व्यक्तता

शब्द थकले, मौनही आज थकले सांगा नां, आज व्यक्त कसे व्हावे भावनांचा श्वास आज गुदमरलेला सांगा नां, जगणे सुलभ कसे व्हावे कधीतरी सहज मनमोकळे करावे कां उगा ? सांजवेळी साशंक व्हावे अव्यक्ताचे, जीवनी अर्थ वेगवेगळे मनीचे सारे सत्य बोलुनी मुक्त व्हावे आज नां, कुठलीच याचना अपेक्षा तरीही, जीवनी निश्चिंत कसे व्हावे तड़जोड जीवनी, हीच मन:शांती हेची […]

चंदन

तू कधी चंदनाचं झाड पाहिलंस का रे? मीही नाही रे पाहिलं आपल्या वाट्याला येतात ते छोटे इवलूशे तुकडे त्यातूनच त्याचा सुगंध हुंगून तृप्त व्हायचे कधीतरी भेटतो तो एखाद्या जवळून गेलेल्या अत्तराप्रमाणे अर्धोन्मीलित अवस्थेत श्वासात सामावून घेतो आपण क्षणभरच.बघू वळून पाहू पण चुटपुट लागते हरवतो तो न जाणो किती दिवस. अगदी अगदी दडून बसतो अवचित मग कधी […]

चेहऱ्याला सजवावे म्हणतो

चेहऱ्याला सजवावे म्हणतो अश्रूंना लपवावे म्हणतो, नव्या ऋतूच्या स्वागताला नव्याने उमलावे म्हणतो. पुन्हा एकदा रुजावे म्हणतो वादळवाऱ्यात तगावे म्हणतो, कोसळणाऱ्या प्रपातातून स्वत:ला वाचवावे म्हणतो. पुन्हा एकदा उडावे म्हणतो आभाळाला भेटावे म्हणतो, सुकलेल्या एका दाण्यासाठी दोन थेंब मागावे म्हणतो. पुन्हा एकदा जगावे म्हणतो ताठ उभे रहावे म्हणतो, खोल ओलाव्याच्या शोधात खोल खोल जावे म्हणतो. झाडांपासून शिकावे म्हणतो […]

आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा आणि उद्योजिका मीनल मोहाडीकर

आजपर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्र चेम्बर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चरची पहिली महिला अध्यक्ष जर कुणी असेल तर मीनलताईंचे नाव सन्मानपुर्वक घेतले जाते. ‘मराठी माणसाने आपली नोकरी करावी’ या पराभूत मानसिकतेमधून जगणाऱ्या समाजात कोणत्याही पाठबळाशिवाय उभ्या राहिलेल्या मीनल यांनी २०१३ साली शारजात केवळ उदघाटन करून कुठलेही प्रदर्शन न भरवलेल्या इंडियन एग्झिबीशन सेंटर शारजा येथे प्रदर्शन केंद्रात, २०१४ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर दुबई येथे यशस्वी उद्योजकांची बाजारपेठ प्रदर्शनाद्वारे नुसतीच आयोजित करुन दाखवली नाहीतर यशस्वी करून दाखवली. ज्या अरब देशात तेथील महिलांना देखील सार्वजनिक जीवनात असे कार्य करण्याची मुभा नाही तेथे जाऊन एका मराठी महिलेने हा नेत्रदीपक उद्यम यशस्वी केला. […]

गजरेवाला

पूर्वी ‘ती फुलराणी’ सारख्या नाटकांच्या प्रयोगाला प्रेक्षागृहात, मोगऱ्याचा दरवळ सुटायचा. आता तशी नाटकंही नाहीत आणि प्रेक्षकही.. काही समारंभाना, सोहळ्यांना आयोजकच प्रेक्षकांना दरवाजाशीच गजरे देत असत. सहाजिकच तेथील वातावरण सुगंधित होत असे.. […]

“आमची माती आमची माणसं” कृषीविषयक कार्यक्रम घराघरात पोहचवणाऱ्या शिवाजी फुलसुंदर

शिवाजी फुलसुंदर हे शेतकरी कुटुंबातून आलेले असल्याने शेतकरी बांधवांना नेमके काय हवे याची त्यांना जाणीव होती. गावाशी घट्ट नाळ जोडलेली असल्याने शेतक-यांच्या प्रश्नांची दाहकता त्यांनी अनुभवली होती. सर्व प्रथम त्यांनी ‘आमची माती आमची माणसं’ या कार्यक्रमाचे शीर्षक गीत ज्येष्ठ कवी गीतकार शांतारामजी नांदगांवकर यांच्या सहकार्याने साकारलेले हे शीर्षक गीत “ही काळी आई,धन धान्य देई, जोडते मनाची नाती,आमची माती आमची माणसं,” घराघरात पोहचलेल आहे. या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी विविध कृषीविषयक कार्यक्रमांची निर्मिती अनेक वर्षं केली आहे. शिवाजी फुलसुंदर यांनी १९८५ साली ‘गप्पागोष्टी’ हे नवीन सदर सुरू केले.
[…]

नाटककार जॉर्ज कॉफ्मन

त्याने राजकीय प्रहसनं लिहिली, विनोदी नाटकं लिहिली आणि काही संगीतिकाही लिहिल्या. नील सायमन वगळता इतर कोणत्याही विनोदी अमेरिकन नाटककाराला त्याच्याइतकी लोकप्रियता लाभली नव्हती. दोन महायुद्धांच्या काळातल्या ब्रॉडवेवरच्या सर्वांत लोकप्रिय आणि हिट नाटकांचा तो लेखक-दिग्दर्शक होता. त्याने बहुतेक वेळा सहकाऱ्यांच्या साथीने तब्बल ४५ नाटकं लिहिली आणि बहुतेक सर्वच कमालीची यशस्वी ठरली. त्याच्या नाटकांमधल्या योगदानाबद्दल त्याला दोन वेळा पुलित्झर पारितोषिक मिळालं होतं. दी मॅन हू केम टू डिनर, यू कान्ट टेक इट विथ यू, मेरीली वुई रोल अलाँग, दी बटर अँड एग मॅन, डल्सी, स्टेज डोअर, ऑफ दी आय सिंग, दी कोकोनट्स, डिनर ॲ‍ट एट, असं त्याचं लेखन तुफान लोकप्रिय झालं होतं. […]

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग १०

परीक्षा घेणारा ही तोच! तरणाराही तोच! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त! जाता जाता… अजूनही गुरुदेवांच्या चमत्कारांच्या पोतडीत काही तरी होते माझ्यासाठी! […]

काठीला आवाज नसतो

परकिय देतात खूप मोठा मान स्वकिय करतात एकसारखा अपमान परकिय करतात हो खूपच आदर. स्वकियांना नाही मुळीच कसलीही कदर बाहेरचे लावतात किती प्रेमाने माया. घरच्या साठी मात्र जन्म घालवला वाया अनेकंनी जोडली अनेक नाती. नेमकी स्वकियांनी याचीच केली माती पण देवाच्या दारी नसतो कधीच अंधार. कुणाच्या तरी रुपाने देतो तो शाब्दिक आधार आधार देवाच्या काठीला नसतो […]

ग्रीन टीच्या संशोधिका मिशियो शुजीमुरा

शुजीमुरा यांना हायस्कूल मध्ये असल्यापासून विज्ञानाची आवड निर्माण झाली.१९२० मध्ये, त्यांनी आपले लक्ष वैज्ञानिक संशोधक बनण्यावर केंद्रित केले आणि होक्काइडो इम्पीरियल युनिव्हर्सिटीमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम काम करण्यास सुरूवात केली. त्यांनी सुरुवातीला रेशीम कीटकांच्या पोषणावर संशोधन सुरू केले, परंतु १९२२ मध्ये त्यांची जीवनसत्त्व संशोधक उमेटारो सुझुकी यांच्यासह टोकियो इम्पीरियल विद्यापीठात बदली झाली. इथे मिशिओने ग्रीनच्या बायोकेमिस्ट्रीवर संशोधन केले. दोन वर्षांनंतर, त्यांनी आणि त्यांचे सहकारी सितारो मिउरा यांच्या सह ग्रीन टी मध्ये ‘व्हिटॅमिन सी’ असल्याचा शोध लावला, ज्यामुळे उत्तर अमेरिकेत ग्रीन टीची निर्यात वाढली. […]

1 181 182 183 184 185 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..