पावसाचा थेंब तूं
धुवाधार तो घनमेघ बरसता चिंब भिजविणारा पावसाचा थेंब तूं मनह्रदयीच्या पागोळ्यातुनी अलवार रिमझिमणारा प्रीतस्पर्श तूं ओले ओले मृदगंधले मनांगण मनी दरवळणारा पावसाचा थेंब तूं कोसळणाऱ्या, सरिसरितुनी झरझरणाऱ्या, पावसाचा थेंब तूं प्रीतयुगुलांना, हा ऋतुराज हवासा चिंब बरसणाऱ्या पावसाचा थेंब तूं सृष्टिचे रूपरंग, वादळी सप्तरंगले नभा खुलविणारा पावसाचा थेंब तूं प्रीतभारला, मनामना भावणारा अवीट रेशमस्पर्शी पावसाचा थेंब तूं […]