सिलोन रेडिओचे निवेदक गोपाल शर्मा
‘गोपाल शर्मा’ यांनी काही खास शब्द वापरात आणले. ‘आवाज की दुनियाके दोस्तो’ हा शब्दप्रयोग त्यांचाच. (त्यांच्या आत्मचरित्राचं नावही हेच आहे. ) ‘शुभाशिष’, ‘शुभरात्री’, ‘बंधूवर’ हे शब्दही त्यांनीच प्रथम रेडीओवर आणले.
‘शहाजहाँ’ चित्रपटातील कुंदनलाल सैगल यांच्या एका गीतात, महंमद रफींचा अल्प सहभाग आहे. ‘अपनी पसंद’ या कार्यक्रमात गोपालजींनी हे गाणं लावलं आणि रफीचा आवाज असलेली ती ओळ त्यांनी श्रोत्यांना लागोपाठ तीन-चार वेळा ऐकवली. […]