मोना डार्लिंग
बिंदूने १९८५ सालापर्यंत अनेक चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यातील ‘इम्तिहान’, ‘हवस’, ‘कामशास्त्र’ चित्रपटातील भूमिका व्हॅम्पीश होत्या. ‘अभिमान’, ‘अमरप्रेम’ सारख्या चित्रपटातील तिच्या भूमिका, दुसऱ्या टोकाच्या होत्या. ‘हम आपके है कौन’ सारख्या चित्रपटांतून तिने मावशी, आत्याच्या भूमिका केल्या. आजवर २०० हून अधिक चित्रपटात कामे करुन तिने आता चित्रसंन्यास घेतलेला आहे. तिच्या भूमिकांचं कौतुकही झालं, मात्र सात वेळा फिल्मफेअरसाठी नामांकन मिळूनही, तो पुरस्कार काही तिला मिळाला नाही.. […]